Baba Siddique Death News Live Updates : मला एक खून माफ करावा– राज ठाकरे
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी संध्याकाळी मुंबईतील वांद्रे पूर्व येथे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, माजी राज्यमंत्र्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस सोडण्यापूर्वी ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीत होते. 1980 मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि चार वर्षांनी ते अध्यक्ष झाले. 1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 12:46 PM • 13 Oct 2024
Maharashtra News : मला एक खून माफ करावा – राज ठाकरे
भारताच्या राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे मला खून माफ करा.ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला त्यांचा मला खून करायचे आहे असे मिश्कील वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.
- 10:51 AM • 13 Oct 2024
Maharashtra News : बाबा सिद्दीकींच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
बाबा सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिस आणि आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावले असून कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. बाबा सिद्दीकी हे वरिष्ठ नेते होते, माजी मंत्री होते. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
- 10:50 AM • 13 Oct 2024
Maharashtra News : अजित पवार कूपर रूग्णालयात जाणार?
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. यात बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. कूपर रूग्णालयात बाबा सिद्दिकी यांचं पोस्ट मार्टम केलं जात आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते उपस्थित आहेत. स्वत: अजित पवार देखील कूपर रूग्णालयात जाणार आहेत.
- 10:48 AM • 13 Oct 2024
Maharashtra News : महिला, व्यापारी राजकीय नेते सुरक्षित नाहीत – संजय राऊत
महिला, व्यापारी राजकीय नेते सुरक्षित नाहीत… राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज्याच्या गृहमंत्र्याची काही जबाबदारी आहे की नाही? हत्यांचं सत्र राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलं आहे… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
- 09:05 AM • 13 Oct 2024
Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दिकी वादात का होते?
-
पिरॅमिड डेव्हलपर्सच्या वांद्रे रेक्लेमेशनजवळील "जमात-ए-जमहुरिया" नावाच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता झाल्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकांनी हा भूखंड सत्रा ग्रुपला 90 कोटी रुपयांना विकला होता. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे अध्यक्ष असताना त्यांनी फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) वाढवण्याचा निर्णय घेतल्याने यात सिद्दीकी यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. याला सत्तेचा दुरुपयोग म्हटले जायचे.
-
-
- 08:59 AM • 13 Oct 2024
Baba Siddique Shot Dead Live Update : झिशान सिद्दीकींच्या घराबाहेर कडकोट बंदोबस्त
झिशान सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत. सध्या कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. बाबा सिद्दीकी हे ज्येष्ठ नेते होते, माजी मंत्री होते, त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
- 08:58 AM • 13 Oct 2024
Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दींच्या हत्याचा तपास दया नायक यांच्याकडून सुरु
Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकी हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे पथक करत आहे. दया नायक हे गुन्हे शाखा युनिट 9 चे प्रभारी आहेत. सध्या पोलिसांनी काल रात्री दोन आरोपींना अटक केली आहे, एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहे.
- 08:58 AM • 13 Oct 2024
Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. तर एक गोळी ही त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT