तीव्र दुष्काळ असलेल्या भागांना दिलासा मिळणार? अंदाज काय?

मुंबई तक

Maharashtra drought : महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून मराठवाडा आणि विदर्भात लोकं पाऊस पडेल, ही आशा ठेऊन आहेत. पुढील काही दिवसांत काही कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे? जाणून घेऊयात..

ADVERTISEMENT

Maharashtra drought
Maharashtra drought
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

Maharashtra Drought | तीव्र दुष्काळाच्या भागांना दिलासा मिळणार का? | Rain

point

मग तीव्र दुष्काळाच्या भागांना पावसाचा दिलासा मिळणार का? पाहा सविस्तर

Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना दुष्काळग्रस्त भागांना पावसाचा दिलासा मिळणार का? हा प्रश्न कायम आहे. राज्य सरकारने 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. म्हणजेच राज्यातील सुमारे 74 टक्के तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. 25 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात 798.2 मिलिमीटर पाऊस झाला असून, सामान्य पावसाच्या तुलनेत 18 टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यात कमी पावसाचं हे प्रमाण ३८ टक्के, तर विदर्भात 23 टक्के असल्याचं हवामान खात्याच्या आकडेवारीवर आधारित अहवालात नमूद आहे.

हेही वाचा : ठाणे हादरलं, ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या, प्रदीप पुर्णेकरांना क्रूरपणे संपवलं

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस झाला? 

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात कमी पाऊस झाला आहे. बीडमध्ये सरासरीपेक्षा 52 टक्के कमी, हिंगोलीत 48 ते 49 टक्के कमी आणि परभणीत 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. अहिल्यानगरमध्ये 46 टक्के, धाराशिव आणि लातूरसह काही भागांतही पावसाचे प्रमाण फार कमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस झाला आहे. मात्र जिल्ह्यात सर्व ठिकाणी सारखा पाऊस झाला नसल्याने काही भागांत तीव्र दुष्काळाची परिस्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे. विदर्भात यवतमाळमध्ये 23 टक्के, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये 28 टक्के, तर अमरावतीमध्ये सुमारे 40 टक्के पावसाची तूट आहे.

पावसाचा अंदाज काय? कुठे कोसळणार? 

दरम्यान, पुढील काही दिवसांत काही भागांना हलक्या ते मध्यम पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासह सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र या भागांत पाऊस होईलच अशी शक्यता नाही. गुरुवारीही पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि कोकणातील काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज आहे.