‘चिअर्स!!!’ 24, 25 डिसेंबर आणि थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Maharashtra Liquor Sale Update On December 24th 25th and 31st alcohol will be available till morning
Maharashtra Liquor Sale Update On December 24th 25th and 31st alcohol will be available till morning
social share
google news

Liquor Sale Update : नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता सरकारने चिअर्स केलं आहे. नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे. तसंच गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी केले आहेत. (Maharashtra Liquor Sale Update On December 24th 25th and 31st alcohol will be available till morning)

ADVERTISEMENT

गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानांच्या परवान्यानुसार, दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.

वाचा : Manoj Jarange : ‘तुम्ही विचार करायचा होता ना?’, जरांगे पाटलांनी पकडलं कात्रीत

तसंच दारूविक्रीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशनस विमानतळ आणि क्रूझ जहाजांवरही मद्यविक्री होणार आहे.

हे वाचलं का?

परिपत्रकानुसार कोणत्या वेळेत दारूची दुकाने राहणार सुरू?

  • विदेशी दारू विक्री पहाटे 1 पर्यंत सुरू राहिल.
  • उच्च दर्जाची दारू विक्री पहाटे 1 पर्यंत सुरू राहिल.
  • परवाना कक्षातील दारू विक्री पहाटे 5 पर्यंत सुरू राहिल.
  • बिअर बार, पब पहाटे 5 पर्यंत सुरू राहतील.

वाचा : Mohan Yadav : मुख्यमंत्री होताच पहिल्या निवडणुकीत ‘चीतपट’, मिळाली फक्त 5 मते

सर्वांसाठी सेलिब्रेशन पण पोलिसांची होणार दमछाक

24, 25 रोजी असणारं नाताळचं सेलिब्रेशन आणि 31 डिसेंबरला वर्षाचा शेवटचा दिवस हे तीन दिवस सर्वांसाठी सेलिब्रेशचे असतात. पण यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची मात्र दमछाक होते. राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवल्याने पोलिसांची कसरत होणार आहे. हे पोलिसांसाठी एक आव्हानच आहे.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT