अर्णब चक्रीवादळानंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. ‘अर्णब’ (Cyclone Arnab) चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असतानाच राज्यातील काही भागांत पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Report
Maharashtra Weather Report
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

point

काय सांगतो हवामान अंदाज?

Maharashtra Weather Report : महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल बघायला मिळू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-घाटासह अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यादरम्यान विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या घाट परिसरासह रायगड आणि रत्नागिरीमध्येही हवामान ढगाळ राहून वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाची स्थिती कायम

ऑक्टोबरच्या शेवटी होत असलेल्या या हवामान बदलामागे अर्णव चक्रीवादळाचा प्रभाव कारणीभूत होता, जो आता कमकुवत होऊन ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात बदलला आहे. या प्रणालीमुळे छत्तीसगड, ओडिसा आणि पश्चिम बंगालसह पूर्व भारतात मुसळधार ते अतिवृष्टी झाली आहे. चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी, त्याच्या उरलेल्या प्रणालीमुळे निर्माण झालेले ढग आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे महाराष्ट्रासह विविध भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहिली आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, RTI मधून धक्कादायक माहिती समोर, 2022 पासून काय घडलं?

नव्या हवामान प्रणालीची निर्मिती

अर्णव चक्रीवादळ निवळत असतानाच आता दक्षिण अंदमान समुद्रात आणखी एका नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली आहे. समुद्रावर तयार झालेले हे नवीन कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात आणि त्यानंतरच्या 24 तासांत डिप्रेशनमध्ये बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही नवीन प्रणाली हळूहळू पश्चिम-वायव्य दिशेने सरकताना दिसत आहे.

हे ही वाचा : 'फेकनाथ मिंधेला एवढी हिंमत असती ना तर...', आदित्य ठाकरे ठाण्यात जाऊन शिंदेंवर बरसले!

आगामी 48 तास महत्त्वाचे

या नव्या हवामान प्रणालीच्या आगामी वाटचालीवर हवामान तज्ज्ञांचे लक्ष असून, तिचा मार्ग आणि तीव्रता जशी स्पष्ट होईल, त्यानुसार ती महाराष्ट्राच्या हवामानावर नेमका काय प्रभाव पाडणार हे स्पष्ट होईल. सध्यातरी ही प्रणाली अतिशय सशक्त वाटत असून, तिच्या प्रभावामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी 48 तासांमधील या प्रणालीच्या हालचालींवरून महाराष्ट्रावरील परिणामाचे अचूक चित्र समोर येईल.