राज्यभरात पावसाचा हाहाकार, कोकणासह 'या' भागात पूरजन्य परिस्थिती, नागरिकांनो काळजी घ्या

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान केंद्राने 20 ऑगस्ट 2025 रोजी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे.

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभाग (IMD)

point

या भागात पूरजन्य स्थितीचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान केंद्राने 20 ऑगस्ट 2025 रोजी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि विदर्भातील काही भागांमध्ये  जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याती काही भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

हे ही वाचा : मिठी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तरुण गेला वाहून, धडकी भरवणारा Video व्हायरल

कोकण आणि मध्य महाराष्ट्र : 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच आता 20 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर  काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरींसह 40-50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाडा :

गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात तुरळक ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, परंतु काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.

खानदेश आणि इतर भाग : 

सरासरीइतका पाऊस अपेक्षित आहे, परंतु काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा : मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस

पूरजन्यस्थितीचा धोका : 

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर 50-60 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच मच्छिमारांना 20 ऑगस्ट रोजी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. डोंगराळ भागात भूस्खलन आणि पूरजन्यस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp