Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्याच्या अखेर वातावरणात बदल, 'या' भागांत हुडहुडी वाढणार

Maharashtra Weather : राज्याच्या हवामानात सध्या सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारवा वाढू लागला आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या हवामानात सध्या सातत्याने चढ-उतार

point

हुडहुडी भरण्याची शक्यता

Maharashtra Weather : राज्याच्या हवामानात सध्या सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारवा वाढू लागला आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 30 नोव्हेंबर 2026 रोजी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार असून विभागनिहाय हवामानाचा अंदाज खालीलप्रमाणे आहे:

कोकण

कोकण किनारपट्टीवर हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. काही भागांत सकाळी हलके धुके पाहायला मिळू शकते, मात्र दुपारच्या सत्रात उष्ण आणि दमट वातावरण जाणवेल.

मध्य महाराष्ट्र

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत आकाश मुख्यतः निरभ्र आणि हवामान कोरडे राहील. येथे सकाळी हलका गारवा, तर दिवसा उबदार वातावरण राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत सोमवारी आकाश निरभ्र राहील. हवामान कोरडे राहणार असून रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडीचा जोर अधिक जाणवेल.

मराठवाडा

 बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश राहील. या भागात दिवसा उन्हाचे चटके, तर पहाटे आणि रात्री गारठा असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळेल.

विदर्भ 

नागपूर, अमरावतीसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सोमवारी हवामान कोरडे राहील. विदर्भात रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका चांगलाच जाणवण्याची शक्यता आहे.