मामीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडला भाचा; मामाने रंगेहात पकडलं; शेवटी कोणाचा झाला मर्डर?

Crime News : उत्तर प्रदेशातील बांदामध्ये 21 वर्षीय तरुणाची काठीने मारहाण करून हत्या करण्यात आली. मामाच्या घरी घडलेल्या प्रकारानंतर तरुणाचा मृतदेह त्याच्याच घराबाहेर फेकण्यात आला.

ADVERTISEMENT

Crime News :Crime News :
Crime News :
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मामाच्या घरी दारूची पार्टी,

point

नंतर मामीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडला भाचा; कोणाचा झाला मर्डर

Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील पैलानी परिसरात 21 वर्षीय तरुणाची काठीने मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर तरुणाचा मृतदेह त्याच्याच घराच्या दरवाजासमोर फेकून देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तरुण आणि एका महिलेच्या संबंधांवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, संबंधित महिलेने तरुणावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमके सत्य काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का? राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...

पत्नी आणि भाचा आक्षेपार्ह अवस्थेत, अन् थेट झाला मर्डर 

मृत तरुण गुजरातमध्ये मजुरीचे काम करत होता. सण साजरा करण्यासाठी तो दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी परतला होता. गावात आल्यानंतर तो आपल्या नात्यातील मामाच्या घरी गेला. तिथे दोघांनी एकत्र बसून दारू प्यायली. त्यानंतर मामा काही वेळाने घराच्या छतावर झोपण्यासाठी गेला. मात्र, काही वेळाने त्याला जाग आली आणि तो खाली आला. त्यावेळी त्याला पत्नी आणि भाचा आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसल्याचा आरोप आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर मामाचा राग अनावर झाला आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक घटनेत झाले.

हेही वाचा : डिलिमिटेशनविरोधात सोनिया गांधी मैदानात, स्टॅलिन-पवारांना भेटणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

संतापलेल्या मामाने काठीने तरुणावर केले अनेक वार 

पोलिसांच्या माहितीनुसार, संतापलेल्या मामाने काठीने तरुणावर अनेक वार केले. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने तरुणाचा मृतदेह त्याच्याच घराच्या दरवाजासमोर आणून टाकला. मृतदेह घराच्या दरवाजात पडलेला दिसताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

बांदाच्या उपअधीक्षक प्रतिज्ञा सिंह यांनी या घटनेची माहिती दिली. पैलानी परिसरात 21 वर्षीय तरुणाला काठीने मारहाण करण्यात आली होती. गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच, मोहल्ल्यातील अन्य एका व्यक्तीच्या मदतीने मृतदेह त्याच्या घराच्या दरवाजासमोर फेकण्यात आल्याची माहिती समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील दोन्ही नामनिर्देशित आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संबंधित महिलेने तरुणावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या आरोपाचीही पोलीस चौकशी करत आहेत. घटनेच्या रात्री नेमके काय घडले आणि हत्येमागील संपूर्ण कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे.