मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेचा मोठा प्लॅन! लोकलमधील वाढत्या गर्दीवर शोधला 'हा' उपाय

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर पश्चिम रेल्वेने एक उपाय शोधला आहे. अंधेरी ते वांद्रे या मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पश्चिम रेल्वेचा मोठा प्लॅन

point

वाढत्या गर्दीवर उपाय

Mumbai News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने अंधेरी ते वांद्रे दरम्यान 15 डब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करण्याच्या दिशेने कामाला वेग दिला आहे. यासाठी मार्गावरील वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येत आहे. 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी किमान 330 मीटर असणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना गर्दीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

काम किती झालं आहे?

या प्रकल्पाअंतर्गत खार रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर वांद्रे स्थानकावरील काम सुमारे 75 टक्के पूर्ण झाले आहे. सांताक्रूझ स्थानकावर आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, विलेपार्ले स्थानकावरील कामाच्या प्रगतीबाबत वेगवेगळे आकडे समोर आले आहेत. एका माहितीनुसार 40 टक्के, तर दुसऱ्या माहितीनुसार 10 टक्के काम पूर्ण झाले आहे. वाढवण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मच्या भागावर छत उभारण्याचे कामही सुरू आहे.

हे ही वाचा : विमानात बसण्याआधी राहुल गांधींचं DMK ला साकडं, स्टॅलिन यांच्या रिप्लायची जोरदार चर्चा!

गर्दीच्या वेळी प्रवाशांना फायदा

15 डब्यांच्या लोकलमुळे एका फेरीत सुमारे 600 अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सध्या 12 डब्यांच्या लोकलमधून एका वेळी जवळपास 2,400  प्रवासी प्रवास करू शकतात. तर 15 डब्यांच्या लोकलची क्षमता सुमारे 3,000 प्रवाशांची आहे. म्हणजेच प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत जवळपास 25 टक्क्यांनी वाढ होणार आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या लोकलचा प्रवाशांना मोठा फायदा होईल. अधिक प्रवाशांना सामावून घेता येणार असल्याने लोकलमधील गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

हे ही वाचा : प्रश्न केवळ बिसलेरीच्या पाण्याचा नाही, घरा-घरात होणाऱ्या अस्वच्छ पाणी पुरवठ्यावर नागरिक शांत का?

काम  कधीपर्यंत पूर्ण होणार?

दरम्यान, अंधेरी ते वांद्रे या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू केल्यानंतर पश्चिम रेल्वेचा हा विस्तार पुढे दादर आणि त्यानंतर मुंबई सेंट्रलपर्यंत करण्याची योजना आहे. मात्र, हा विस्तार टप्प्याटप्प्याने केला जाणार असून प्रत्येक स्थानकावरील प्लॅटफॉर्मची क्षमता आणि पायाभूत सुविधांची तयारी पाहून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मार्च 2027 पर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवासात महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.