डिलिमिटेशनविरोधात सोनिया गांधी मैदानात, स्टॅलिन-पवारांना भेटणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

विरोधी आघाडीमध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर एकमत घडवून आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी आज एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला सोनिया गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Delimitation Bill
Delimitation Bill
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक

point

काँग्रेसचे नेते घेणार स्टॅलिन यांची भेट

point

शरद पवारांनाही भेटणार

Delimitation Bill : देशात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून म्हणजेच परिसीमनाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत एकमत घडवून आणण्यासाठी काँग्रेसने हालचाली वेगवान केल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. या दौऱ्यात सोनिया गांधीही सहभागी होण्याची शक्यता असून, काँग्रेसशासित तीन राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील या बैठकांना उपस्थित राहू शकतात. ठरलेल्या कार्यक्रमानुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सकाळी 11 वाजता दिल्लीहून रवाना होऊन दुपारी 2 वाजता चेन्नईत पोहोचतील.

कसं आहे बैठकीचं सत्र?

चेन्नईमध्ये मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांची एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत परिसीमनाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व मुंबईला रवाना होईल. शरद पवार गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे रात्री साडेआठच्या सुमारास रुग्णालयात पोहोचण्याची शक्यता आहे. ही बैठक जवळपास एक तास चालू शकते. परिसीमनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांची भूमिका आणि पुढील रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

हे ही वाचा : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का? राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...

विरोधकांची चिंता काय?

दरम्यान, देशात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या नव्याने निश्चितीचा मुद्दा चर्चेत आहे. सध्या लोकसभेतील मतदारसंघांची रचना 1971 च्या जनगणनेवर आधारित आहे. या रचनेवरील स्थगिती 2026 नंतर संपणार आहे. त्यानंतर नव्या जनगणनेच्या आधारे परिसीमनाची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावरून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तामिळनाडूमधील डीएमके आणि इतर विरोधी पक्षांना भीती आहे की, लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांच्या लोकसभेतील जागा कमी होऊ शकतात. दुसरीकडे, उत्तर भारतातील अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसदेत दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होऊ शकते, अशी चिंता विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : Delimitation बिलावरून Ulhas Bapat यांनी कोणती भीती वर्तवली?

काँग्रसेचा  प्रयत्न काय?

या पार्श्वभूमीवर परिसीमन विधेयकाबाबत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित भूमिका तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. डीएमकेसह इतर मित्रपक्षांना या मुद्द्यावर ठोस भूमिका हवी आहे. त्यामुळे विधेयकाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मित्रपक्षांच्या चिंता आणि आक्षेप समजून घेण्यावर काँग्रेसचा भर आहे. खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या या बैठकांकडे विरोधी पक्षांमधील समन्वय वाढवण्याची आणि परिसीमनाविरोधात संयुक्त रणनीती तयार करण्याची महत्त्वाची राजकीय हालचाल म्हणून पाहिलं जात आहे.