विधवा सून गावातील तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, सासऱ्याने पाहिलं अन् एकच गोंधळ; अखेर काय घडलं?

बांदा येथे एका सासऱ्याने विधवा सून आणि तिच्या प्रियकरावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला आहे. सासऱ्याने या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने तो संतापला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विधवा सून आणि तरुण आक्षेपार्ह अवस्थेत

point

सासऱ्याने पाहताच संतापला

point

तरुणाची निर्घृण हत्या

Crime News : कौटुंबिक वादातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका सासऱ्याने आपल्या इतर मुलांच्या मदतीने विधवा सुनेसोबत राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या हल्ल्यात महिलाही गंभीर जखमी झाली आहे. राम मनोहर असे मृत तरुणाचे नाव असून, विद्या असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली.

आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, विद्या हिच्या पतीचे सुमारे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती गावातीलच राम मनोहर याच्यासोबत राहू लागली होती. मात्र, सुनेच्या या निर्णयाला तिच्या सासऱ्याचा विरोध होता. यावरून सासरा आणि सुनेमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी सासऱ्याने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि सासऱ्याने आपल्या इतर मुलांसह राम मनोहर आणि विद्या यांच्यावर सांगी या धारदार शस्त्राने हल्ला केला.

हे ही वाचा : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का? राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...

महिलाही गंभीर जखमी

या हल्ल्यात राम मनोहर याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विद्या ही गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये हलवले. दरम्यान, पोलिसांनी राम मनोहर याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हे ही वाचा : अकोला हादरले! तरुणाच्या डोक्यावर सपासप वार, बोटे तोडली अन् चेहरा केला विद्रूप

पोलिसांनी काय सांगितले?

या प्रकरणाबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, चौसड गावात दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचे समोर आले. या हल्ल्यात राम मनोहरचा मृत्यू झाला असून विद्या गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.