Maharashtra Weather : राज्यात पावसाची उघडझाप, कुठे गायब तर कुठे हलका

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Photo)
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता

point

16 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : राज्यात गणेशोत्सवर सणाच्या तोंडावर दोन दिवस काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. अशातच जाणून घेऊयात 16 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तिवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : 10 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसोबत 9 जणांकडून लैंगिक अत्याचार, आठ जणांच्या आवळल्या मुसक्या

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता अधिक वर्तविण्यात आलीये. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा येथे मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.