Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही
Maharashtra rain forecast : राज्यावर दुहेरी हवामानाचं संकट निर्माण झालं आहे, ज्यात पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. 17 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यावर दुहेरी हवामानाचं संकट
पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
कूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.
Maharashtra Rain Alert : राज्यावर दुहेरी हवामानाचं संकट निर्माण झालं आहे, ज्यात पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच 17 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.
हे ही वाचा : सावत्र बापाने 'त्या' हेतूने 24 वर्षीय विवाहित लेकीला खोलीत नेत...
कोकण
कोकण विभागातील पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हवामान हे उष्ण आणि दमट राहणार आहे, दुपारी किंवा सायंकाळी हलक्या पावसाची स्थिती निर्माण होऊन यलो अलर्टचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून सायंकाळी किंवा दुपारी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदूरबार या जिल्ह्यातील हवामान कोरडं राहील.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच सोलापूरमध्ये यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.










