Maharashtra Weather : राज्यात पुन्हा वातावरण फिरलं, पुढील काही तास फार महत्त्वाचे
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडताना दिसून येत आहे. अशातच जाणून घेऊयात 12 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल
जाणून घेऊयात 12 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडताना दिसून येत आहे. कोकणात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र असून उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज होता. मात्र, आता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे कोरड्या हवामानाची शक्यता राहणार आहे. अशातच जाणून घेऊयात 12 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला.
हे ही वाचा : शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य आणि तेजस ठाकरे मैदानात
कोकण
हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हवामान कोरडे राहील अशी शक्यता वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नाशिक घाटमाथा येथे कोरड्या हवामानाची स्थिती राहील असा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे देखील कोरड्या हवानामाची स्थिती कायम राहणार आहे.
