Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागात किंचित धुके राहण्याची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 11 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचे अंदाज पुढीलप्रमाणे...

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता

point

11 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचे अंदाज पुढीलप्रमाणे

Maharashtra Weather : राज्यात मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. आकाश स्वच्छ किंवा किंचित धुकेदार राहील.थंडीत देखील बऱ्याप्रमाणात घट निर्माण होण्याची शक्यता आहे. हे हवामान राज्यातील शेती, प्रवास आणि दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम करेल. जाणून घेऊयात 11 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचे अंदाज पुढीलप्रमाणे...

हे ही वाचा : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाचा घाला; रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत

कोकण : 

कोकणातील मुंबईमध्ये दिवसभर आकाश स्वच्छ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच थंडावा कमी जाणवेल. सकाळी काही प्रमाणात हलक्या प्रमाणात धुक्याची चादर पसरेल असा हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात धुके जाणवेल. तसेच दुपारी चांगला सूर्यप्रकाश जाणवेल, ज्यामुळे उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यात उष्णता वाढल्याने थंडाव्यात घट होणार आहे. 

मराठवाडा :  

मराठवाडा विभागातील नागपूरमध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानानुसार, दिवसा उकाडा राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp