कोकणात पाऊस घालणार धिंगाणा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात 15 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान खात्याच्या(IMD)च्या ताज्या अपडेट्सनुसार ही माहिती समोर आली आहे. अशातच हवामानाचा अंदाज नेहमीप्रमाणे बदलण्याची चिन्हे आहेत. अशातच 16 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान खात्याच्या(IMD)च्या ताज्या अपडेट्सनुसार माहिती

6 जून रोजी हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात 15 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान खात्याच्या(IMD)च्या ताज्या अपडेट्सनुसार ही माहिती समोर आली आहे. अशातच हवामानाचा अंदाज नेहमीप्रमाणे बदलण्याची चिन्हे आहेत. अशातच 16 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
हेही वाचा : कुंडमळ्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला..6 जणांचा मृत्यू, तर अनेक पर्यटक...
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वारे वाहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा वेग कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता
कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 100 - 150 मिमी पावसाची नोंद होऊ शकते. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस धुमाकूळ घालणार आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूरात वाऱ्यासह पाऊस
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात 40-120 मिमी पावसाची शक्यता असणार आहे. सोलापूरमध्ये तुलनेनं पाऊस कमी असणार आहे. तसेच शेतीसाठी पावसाची परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी पेरणीची पाहणी करावी. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची चिन्हे असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यातील काय मान्सून स्थिती?
मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस थैमान घालणार आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तसेच ढगाळ वातावरणाची परिस्थिती दिसून येईल. तसेच विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी सुरक्षास्थळ गाठावं.
विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
तसेच विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाच्या सरी कोसळणार आहेत. वातावरण ढगाळ राहणार असून तापमान आणि आर्द्रता राहणार आहे. शेतकऱ्यांनी मान्सून स्थिती पाहता, पिकांचे संरक्षण करावे आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष द्यावं.
हेही वाचा : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कोसळलेल्या पूलाचे फोटो आले समोर
अशातच रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल आहे. तसेच मुंबई, पुणे आणि कोकणात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच विजपुरवढा खंडीत होऊ शकतो, असे बोलले जात आहे.