Maharashtra Weather: रत्नागिरी, प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी

मुंबई तक

Maharashtra Rain Update : हवामान खात्याच्या (IMD) विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे हे मे महिन्याच्या अखेरीस राज्यात दाखल झाले आहेत. जूनच्या मध्यापर्यंत मान्सून राज्यात सक्रीय झालेला आहे. 15 जून 2025 रोजी राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

आजचं राज्यातील हवामान अपडेट

point

'या' भागांना पावसाचा हाय अलर्ट

Maharashtra Weather Update : हवामान खात्याच्या (IMD) विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे हे मे महिन्याच्या अखेरीस राज्यात दाखल झाले आहेत. जूनच्या मध्यापर्यंत मान्सून राज्यात सक्रीय झालेला आहे. 15 जून 2025 रोजी राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दरम्यान, राज्यात जवळजवळ बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. यावेळी वादळी वाऱ्यांचा प्रभाव असेल. तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल. दरम्यान, 15 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

हेही वाचा : नग्न अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह, आजबाजूला सापडल्या 'या' वस्तू!

कोकण भागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस

राज्यातील कोकण भागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस धिंगाणा घालणार आहे. समुद्रकिनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला असेल. अशातच मच्छिमारांनी सावधगिरी बाळगून समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी

पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी अपेक्षित राहणार आहेत. तर काही ठिकाणी पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. सोलापूरहून सातारा आणि कोल्हापूरात पावसाचे प्रमाण अधिक असेल. दरम्यान, हवामान खात्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती देण्याची सूचना दिली. तसेच पूरपरिस्थिती टाळण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला. 

मराठवाड्यात पावसाची स्थिती

मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस धिंगाणा घालणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर येथे काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वातावरण पाहता विजांची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मोकळ्या ठिकाणी थांबू नये, असा हवामान खात्याने सल्ला दिलाय. 

हे वाचलं का?