काय सांगता! भावाच्या मृतदेहासमोर ढसाढसा रडली बहीण! पण 'तो जिवंत..पोलिसही हादरले!
Kanpur Shocking Viral Story : कानपूरच्या घाटमपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भावाला मृत समजून एका बहिणीने त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं. पण नंतर घडलं..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

मृतदेह पाहून पोलिसांनाही बसला मोठा धक्का

नेमकं घडलं तरी काय?
Kanpur Shocking Viral Story : कानपूरच्या घाटमपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भावाला मृत समजून एका बहिणीने त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं. पण काही वेळातच त्या महिलेचा भाऊ पोलीस ठाण्यात जिवंत पोहोचला. हे पाहून पोलिसांनाही मोठा हादरा बसला. गुरुवारी घाटमपूरमध्ये एका पुलाखाली अज्ञात मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटेल. घाटमपूरमध्ये राहणारी सुमन नावाच्या महिलेनं हा फोटो पाहिला. त्यानंतर तिने असा दावा केला की, हा मृतदेह तिचा लहान भाऊ अजयचा आहे. त्यानंतर ती मृतदेहासमोर ढसाढसा रडली.
पोलिसांनी मृतदेह योग्यरित्या ओळखण्यास सांगितलं, तेव्हा तिने म्हटलं की, ती तिच्या भावाला कसं ओळखणार नाही..सर्वांना वाटलं की अजयचा मृत्यू उष्णतेमुळं झाला असेल. बहिणीच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. सुमनने सांगितलं की, तिचा भाऊ अजय कानपूर देहात येथे राहतो.
हे ही वाचा >> कुंडमळ्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला..6 जणांचा मृत्यू, तर अनेक पर्यटक...
पोस्टमार्टम थांबवलं..मृतदेह कोणाचा?
शुक्रवारी सुमन तिचे वडील, पती आणि कुटुंबातील अन्य लोकांसोबत पोस्टमार्टम हाऊसमध्ये पोहोचली. सर्व रडत होते. तेव्हा घाटमपूर ठाण्यात एक तरुण पोहोचला आणि पोलीस धनंजय पांडे यांच्यासमोर म्हणाला, माझं नाव अजय आहे. मी तर जिवंत आहे. पोलिसांनी माझा मृत्यू झाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
त्यानंतर पांडे यांनाही धक्काच बसला. त्यांनी तातडीनं पोस्टमार्टम हाऊसमध्ये फोन केला आणि अजयच्या मृतदेहाबाबत विचारलं. त्यांनी म्हटलं की, पोस्टमार्टम होणारच आहे. तेव्हा पोलिसांनी अधिकाऱ्यांना लगेच माहिती दिली आणि ज्या मृतदेहातं पोस्टमार्टम होणार होतं, ते थांबवलं.
हे ही वाचा >> पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कोसळलेल्या पूलाचे फोटो आले समोर
सुमनला जेव्हा माहित झालं की, तिचा भाऊ जिवंत आहे आणि तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आहे. तेव्हा कुटुंबियांनाही विश्वास बसला नाही. ते सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. सुमनने तिच्या भावाला जिवंत पाहिल्यानंतर आनंद्राक्षू तरळले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मृतदेहाला मोर्चरीमध्ये ठेवलं. या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये फोटो पाठवला आहे.