Maharashtra Weather : राज्यातील पाऊस गेला कुठे? 'या' जिल्ह्यांवर मोठं विघ्न

मुंबई तक

Maharashtra weather : राज्यात पावसाने दांडी मारल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 18 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह कोकणात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

point

18 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

Maharashtra Weather : राज्यात पावसाने दांडी मारल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अगदीच कमी पाऊस आहे. अशातच जाणून घेऊयात 18 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : बीडच्या तरुणाची लातूरमध्ये निर्घृण हत्या, 10 लाखांच्या वादातून कोयत्याने सपासप वार

कोकण 

कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा परिसरात विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा येथे विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.