वर्धा हादरलं! शेतीच्या जागेचा वाद पेटला, कुऱ्हाडीने वार करत काकू-चुलत भावाला संपवलं अन् पुतण्यानेही...

मुंबई तक

जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील निमसडा गावात सामाईक शेतीच्या वादामुळे मोठा हत्याकांड झाला आहे. पुतण्याने काकू आणि चुलत भावावर कुऱ्हाडीने वार करून स्वत:ही जीवन संपवलं.

ADVERTISEMENT

Wardha Shocking Murder Case
Wardha Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोघांची हत्या करून महेंद्रनेही स्वत:ला संपवलं..

point

त्या शेतात नेमकं घडलं तरी काय?

point

पोलीस तपासात आली खळबळजनक माहिती समोर

वर्धा, सुरेंद्र रामटेक :  जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील निमसडा गावात सामाईक शेतीच्या वादामुळे मोठा हत्याकांड झाला आहे. पुतण्याने काकू आणि चुलत भावावर कुऱ्हाडीने वार करून स्वत:ही जीवन संपवलं. शेतीच्या जागेचा वाद विकोपाला गेला अन् तिघांचाही मृत्यू झाला. महेंद्र मोहिजे (55), नितिन मोहिजे (27) आणि साधना मोहिजे (55) अशी मृतांची नावं आहेत. 

त्या शेतात नेमकं घडलं तरी काय?

पुलगाव सहाय्यक पोलीस अधिक्षक राहुल चौहान यांनी माहिती दिली की, आरोपी महेंद्र मोहिजेनं त्याची काकू साधना मोहिजे आणि चुलत भाऊ नितिन मोहिजे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ला इतका गंभीर होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनेक दिवसांमध्ये शेतीच्या वाटणीवरून या कुटुंबामध्ये वादविवाद सुरु होते. त्यामुळे ही गंभीर घटना घडली. 

हे ही वाचा >> Shefali Jariwala: 'तिच्यासमोरच' त्याने केलेली मृत्यूची भविष्यवाणी, 'तो' Video प्रचंड व्हायरल!

दोघांची हत्या करून महेंद्रनेही विष प्राशन केलं आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र आणि त्याच्या कुटुंबात नेहमीच वादविवाद होत होते. पण या वादामुळे मोठं हत्याकांड घडल्याने खळबळ उडालीय. काकू आणि चुलत भावाची हत्या केल्यानंतर महेंद्रने विष प्राशन केले. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.  

या घटनेमुळं संपूर्ण निमसडा परिसर हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन आणि उप-विभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण तातडीनं घटनास्थळी पोहोचले. अल्लीपूर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसोबत मिळून पंचनामा केला. तिन्ही मृतदेहांच्या तपाणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

हे ही वाचा >> शरीरसंबंधांचे व्हिडिओ बनवण्याची पतीची पत्नीकडे मागणी, पत्नीनं दिला नकार अन् सकाळी उठताच..

हे वाचलं का?

    follow whatsapp