पती-पत्नी खुलेआम लोकांना दाखवायचे अश्लील चाळे,Video रेकॉर्ड करायचे अन् तरुण पोरांना...
Couple Shocking Viral News : पैशांचं सोंग करता येत नाही, असं म्हणतात. होय, ते खरंच आहे..कारण आर्थिक विवंचनेत असणारे काही लोक पैशांसाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मास्क कपल सेक्स चॅट करून व्हिडीओ रेकॉर्ड करायचे अन् नंतर..
ब्लॅकमेलिंग करणाऱ्या कपलचा पोलिसांनी केला पर्दाफाश
पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Couple Shocking Viral News : पैशांचं सोंग करता येत नाही, असं म्हणतात. होय, ते खरंच आहे..कारण आर्थिक विवंचनेत असणारे काही लोक पैशांसाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतात. हैदराबादमध्येही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका पती-पत्नीने पैशांसाठी असं काही केलं, जे पाहून पोलिसही हादरले. दरम्यान, पोलिसांनी या भामट्यांवर अटकेची कारवाई केलीय.
ऑनलाईन अश्लील चॅटने सुरु झालं अन् ब्लॅकमेलिंग पर्यंत..
हे खळबळजनक प्रकरण अंबरपेट येथील मल्लिकार्जून नगरमध्ये घडलं. नरेश आणि पल्लवी नावाच्या कपलवर आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी आधी पैशांसाठी लाईव्ह सेक्स चॅट सुरु केलं. ते प्रत्येक पाच मिनिटांसाठी लोकांकडून 1000 ते 2000 रुपये घेत होते. पण त्यांचा लोभ इथेच थांबला नाही. त्यांनी व्हिडीओ बनवून लोकांना ब्लॅकमेल करायला लागले.
हाय-टेक कॅमेरे आणि रेकॉर्डिंग डिव्हाईस जप्त
पोलिसांनी या आरोपी दाम्पत्याला रंगेहाथ पकडलं. त्यांच्या घरातून पोलिसांना हाय-डेफिनेशन कॅमेरे, रेकॉर्डिंग डिव्हाईस आणि लाईव्ह स्ट्रिमिंगचे साहित्य जप्त केले. तपासादरम्यान, दोघांनीही सांगितलं की, त्यांना पैशांची खूप आवश्यकता होती. नरेश रिक्षा चालवायचा. पण अनेक दिवसांपासून तो आजारी असल्याने मिळणाऱ्या कमाईतून घर चालवणं कठीण झालं होतं.
हे ही वाचा >> 'कांटा लगा' गाण्यावर अवघ्यांना थिरकवणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन, नेमका कसा झाला मृत्यू?
मुलींचं शिक्षण आणि उपचाराचा खर्च बनलं कारण
या दाम्पत्याच्या दोन्ही मुली अभ्यासात खूप हुशार आहेत. एक मुलगी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते. तर दुसऱ्या मुलीला बारावीत 99 टक्के मिळाले आहेत. कॉलेजची फी आणि नरेशच्या औषधांच्या खर्च जमा करण्यासाठी त्यांनी चुकीचा मार्ग निवडला. त्यांना वाटलं की, मोबाईल अॅपच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होता येतं. पोलिसांनी म्हटलं की, आरोपी लाईव्ह व्हिडीओसाठी 2000 रुपये घेत होते. जी क्लिप रेकॉर्ड केली जात होती, त्या क्लिपला 500 रुपयांमध्ये विकलं जात होतं. या अॅपचे जास्त ग्राहक तरुण मुलं होती. त्यांची ओळख लपवण्यासाठी हे दोघेही आरोपी मास्क लावायचे.










