Shefali Jariwala: 'तिच्यासमोरच' त्याने केलेली मृत्यूची भविष्यवाणी, 'तो' Video प्रचंड व्हायरल!
Shefali Jariwala Death Prediction: पारस छाब्रा याच्या पॉडकास्टचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पारसने शेफालीच्या समोरच तिच्या मृत्यूबाबत एक भाकीत वर्तवलं होतं.
ADVERTISEMENT

मुंबई: ग्लॅमरस अभिनेत्री शेफाली जरीवाल हीचं वयाच्या 42 व्या वर्षी आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. शुक्रवारी (27 जून) तिचे निधन झाले. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काल (26 जून) रात्री उशिरा शेफालीच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर तिचे पती पराग यांनी तिला बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. जिथे डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं. प्राथमिक अंदाजानुसार, शेफालीचं कार्डियक अरेस्टने निधन झालेलं असून शकतं असं म्हटलं आहे.
याच दरम्यान, पारस छाब्राच्या पॉडकास्टचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने तिच्या कुंडलीवरून तिच्या 'अचानक मृत्यू'चे संकेत दिले होते. शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं भाकित ऐकून नेटिझन्सनाही धक्का बसला होता.
शेफालीच्या मृत्यूबद्दल पारस छाब्राने काय केलेली भविष्यवाणी?
ऑगस्ट 2024 मध्ये, शेफाली ही पारस छाब्राचा पॉडकास्ट, आबरा का डाबरा शोमध्ये दिसली होती. ते दोघेही यापूर्वी 'बिग बॉस 13' या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते. एपिसोड दरम्यान, पारसने तिच्या कुंडलीबद्दल एक धक्कादायक ज्योतिषीय खुलासा केला होता. त्यावेळी त्याने म्हटले होते की, 'तुमच्या आठव्या घरात चंद्र, बुध आणि केतू बसले आहेत. चंद्र आणि केतूचे संयोजन सर्वात वाईट आहे. आठवे घर नुकसान, अचानक मृत्यू, लपलेले रहस्य, प्रसिद्धी गमावण्याशी संबंधित गोष्टी देखील दर्शवते. चंद्र आणि केतू तुमच्यासाठी वाईट आहेत आणि बुध त्याच्यासोबत बसला आहे. ते चिंता आणि न्यूरोलॉजिकल समस्या दर्शवते.' असं त्याने म्हटलं होतं.

पारस छाब्रा आणि शेफाली जरीवालाचे नाते
पॉडकास्टमध्ये, शेफालीने हे देखील सांगितलं होतं की, आकडी (Epilepsy) येण्याचा त्रास असल्याचं असल्याचे सांगितले होते. तिने सांगितले होते की, तिला वयाच्या 15व्या वर्षी, जेव्हा ती दहावीत होती, तेव्हा तिला पहिल्यांदा फिट आली होती. तथापि, सततच्या वैद्यकीय उपचारांमुळे आणि जीवनशैलीतील काही बदलांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली.