‘सरकारने उपोषणाची वेळ आणू नये’, पाणावलेल्या डोळ्यांनी जरांगेंच्या पत्नीची सरकारला विनंती

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil wife request to cm eknath shinde on maratha reservation mumbai azad maidan protest mumbai police
manoj jarange patil wife request to cm eknath shinde on maratha reservation mumbai azad maidan protest mumbai police
social share
google news

Manoj jarange patil wife request to CM Eknath Shinde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. दुपारी त्यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी देखील चर्चा झाली. मात्र या चर्चेत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता जरांगेंनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. असे असताना मनोज जरांगेंच्या पत्नीने पाणावलेल्या डोळ्यांनी सरकारने त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये, अशी विनंती केली आहे. (manoj jarange patil wife request to cm eknath shinde on maratha reservation mumbai azad maidan protest mumbai police)

टीव्ही 9 मराठीने जरांगेंच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे. यावेळी जरांगेंच्या मुलाने सरकारने मराठा समाज मुंबईत पोहोचण्याआधीच आंदोलनावर तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. तसेच पप्पांची आठवण रोज येते, पण फोन करता येत नाही. पप्पा पुर्ण समाजाच्या वेदना घेऊन, हक्काच्या लढ्यासाठी इथून निघाले आहेत. त्यामुळे पप्पांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जरांगेंचा मुलगा सांगतो.

हे ही वाचा : जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, पोलिसांनी बजावलेल्या ‘त्या’ नोटीसमध्ये काय?

गेल्या 20 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. स्वताला त्रास करून घेतील, पण समाजाला त्रास होणार नाही अशी त्यांची भूमिका असते. त्यांना भोवळ आल्याचे दु:ख वाटतं. गेल्या साडे पाच महिन्यापासून ते घरी नाहीत, याचं दु:ख वाटतं. पण सरकारने जर आरक्षण दिले तर ते नक्की घरी येतील, असे जरांगेच्या पत्नी डोळ्यात अश्रू दाटून बोलत होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईला जाण्यापूर्वी ते आम्हाला इतकचं म्हणाले, आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा. मी त्यांना एवढचं सांगू इच्छिते, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच सरकारने ही वेळेत आरक्षण द्यावे आणि त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंती जरांगेंच्या पत्नीने सरकारला केली आहे. तसेच जर सरकारने आरक्षण दिले तर मुंबई कशाला जाम होतेय, आणि मराठा आरक्षणाच गुलाल टाकून ते वापस येतील, असा विश्वास देखील जरांगेंच्या पत्नीने व्यक्त केला.

हे ही वाचा : Crime : अकोला हादरलं! आधी प्रेयसीचा गळा चिरला मग स्वत:ला संपवलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT