Maratha Morcha : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, बलकवडेंवर सोपवली जबाबदारी
Maratha Morcha : जालन्यातील लाठीहल्यानंतर सरकारने आता ठोस पाऊले उचलली आहेत. त्यामुळे जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Maratha Morcha : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) झालेल्या लाठीहल्ल्याबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधकांनी लाठीहल्ल्याची चौकशी करत आंदोलकांवर लाठीहल्ला का करण्यात आला असा सवाल करण्यात आला. त्यामुळे लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांना दोष देत पोलीस अधिकाऱ्यांना नेमका कोणी फोन केला असाही सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता जालना पोलीस अधीक्षकपदावर असलेल्या तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या शैलेश बलकवडे (shailesh balkawade) यांची नियुक्ती करण्याता आली आहे.
ADVERTISEMENT
विरोधकांचा सरकारला सवाल
खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत मंत्रालयातून अदृश्य फोन कोणाचा गेला. त्यानंतर लाठीहल्ला कोणच्या आदेशाने करण्यात आला होता असा सवाल त्यांनी सरकारला केला होता. त्यानंतर काही अवधीतच राज्य सरकारने जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी आता शैलेश बलकवडे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
हे ही वाचा >>Maratha Morcha : ‘मराठा आरक्षणाला शरद पवारांचा पाठिंबा नाही’; भाजपने दिला पुरावा
पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गोंदिया, नागपूर ग्रामीण आणि कोल्हापूर येथे काम केले आहे. शैलेश बलकवडे यांच्याकडे जालन्याच्या पोलीस अधीक्षकपदी आणून कारवाई तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनीही तात्काळ आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
हे वाचलं का?
दोषींवर कारवाई
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी निवड केल्यानंतर आता विरोधकांची भूमिका काय असणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विरोधकांनी या लठीहल्याची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सररकार काय भूमिका घेणार याकडेही जालन्यासह लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा >> NCP : ”राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात …”, प्रफुल्ल पटेल यांचे मोठं विधान
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT