Maratha Morcha : एकनाथ शिंदेंनी दिले आदेश, ‘या’ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

maratha morcha lathi charge : eknath shinde gave ordered to transfer police officers.
maratha morcha lathi charge : eknath shinde gave ordered to transfer police officers.
social share
google news

Eknath Shinde Maratha Morcha lathicharge : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे. यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले असल्याचे सांगत शिंदेंनी एक आवाहन मराठा आरक्षण समर्थकांना केले आहे.

ADVERTISEMENT

बुलडाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, “काल परवा झालेली घटना दुर्दैवी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालीये. टिकणार आरक्षण देईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही. लवकरच मराठा समाजाला न्याय मिळेल. हक्काचं आरक्षण मिळेल. तो दिवस आता दूर नाही. हा शब्द आणि प्रयत्न आमचा आहे.”

माझ्या त्यांच्यासोबत तीन-चार बैठका झाल्यात

“जो लाठीमार झालाय, तो दुर्दैवी आहे. मी आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसांपूर्वी बोललो होतो. तब्येत खालावतेय, तू रुग्णालयात भरती हो, अशी विनंती मी त्याला केली होती. त्यांच्या माझ्या तीन-चार बैठका झाल्या होत्या. त्याचा मुद्दा आहे, त्यावर काम सुरू आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे वाचलं का?

अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर पाठवणार

“दुर्दैवाने घडू नये ती घटना घडली. मी इतकंच सांगतो की, जे अधिकारी आहेत. जे पोलीस अधीक्षक आहेत, जोशी म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यास मी सांगितले आहे. तसेच दुसरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षकांनाही तत्काळ जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Adani Group : OCCRP Report मुळे चर्चेत आलेले विनोद अदाणी कोण आहेत?

“अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना जालन्याला येतील आणि घटनेची चौकशी करतील. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. निलंबन करावं लागलं तर तेही केलं जाईल. वेळ पडली, तर न्यायालयीन चौकशी केली जाईल. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही”, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमात केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मुक्ताईनगरचा MVA चा उमेदवार ठरला! रोहित पवारांनी केली मोठी घोषणा

“अशा घटनांतून जे राजकीय पोळी भाजू इच्छितात आणि मृताच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम करताहेत. त्यांना बळी पडू नका. हे सरकार तुमचं आहे. जनतेला हे सरकार कधी अंतर देणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT