Maratha Reservaton Live : धुळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला फासलं काळं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation Live updates Manoj jarange press conference live cm eknath shinde maharashtra politics
maratha reservation Live updates Manoj jarange press conference live cm eknath shinde maharashtra politics
social share
google news

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीने उग्र रुप घेतले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले असून, अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदारांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. त्यामुळे आता मंत्र्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

धुळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला फासलं काळं

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : धुळ्यातही मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी धुळे शहरातील अप्पर तहसील कार्यालयासमोर महसूल सप्ताह निमित्त लावलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्रीच्या फलकावर काळे फासत निषेध नोंदवला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा समाजाने याप्रसंगी परिसर दणाणून सोडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परीषद

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हिंगोलीत गुणरत्न सदावर्तेचा पुतळा जाळला

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्तेचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला शॉक देत जाळल्याचा प्रकार समोर आलआ आहे. यासोबतचं हिंगोलीतील गोरेगावमध्ये महिलांनी नारायण राणे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला.

कोल्हापूरात प्रवाशांनी भरलेल्या बसवर दगडफेक

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मराठा तरुणांनी कुरुंदवाड पुणे जाणारी एसटी बस शिरोळ येथील दत्त कारखाना गेट समोर फोडली. अज्ञात तरुणांनी एसटीवर दगड फेक करत एसटीच्या समोरील व मागील बाजुच्या काचा फोडल्या आहेत.सुदैवाने या घटनेत प्रवाशी जखमी झाले नाहीत.याप्रकरणी चालक कैलास डांबरे यांनी शिरोळ पोलिसात तक्रार दिली आहे.

ADVERTISEMENT

साताऱ्यातील मराठा आंदोलनात आ. शिवेंद्रराजे भोसले सहभागी

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : साताऱ्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणात भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले आज सहभागी झाले होते.त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या व्यथा आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केल्या.तसेच ‘मनोज जरांगे पाटील यांना काय झालं तर याचा मोठा उद्रेक होईल’, ‘त्यामुळे आम्हाला त्रास देऊ नका आणि लवकरात लवकर आरक्षण द्या’, असे म्हणत मराठा बांधव आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

बीडमध्ये जाळपोळीनंतर 40 मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : बीडमध्ये जाळपोळीनंतर पोलिसांनी 40 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आंदोलकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान सोमवारी बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमधील आमदार प्रकाश सोळंखे यांच्या बंगल्यांना जाळल्याची घटना घडली होती.

आमदार संदीप क्षीरसागरांच्या बंगल्याचा पंचनामा सुरु

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi :  बीडचे आमदार आ. संदिप क्षीरसागर यांचा बंगला जळून खाक झाला आहे. तसेच बंगल्यात असलेल्या 8 चारचारी गाड्या जाळण्यात आल्या होत्या. या गाड्या देखील जळून खाक झाल्या आहेत. सोमवारी मराठा आंदोलकांनी बंगला आणि गाड्या पेटवल्या होत्या. आता संदीप क्षीरसागरांच्या बंगल्याचा बीड पोलिसांकडून पंचनामा सूरू आहे.

मंत्री सुभाष देशमुखांच्या घराबाहेर मराठा समाजाचं आंदोलन

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर मराठा समाजाने आंदोलन केले आहे. यावेळी देशमुखांनी मराठा आंदोलकांची भेट घेत, ‘माझ्या राजीनाम्यामुळे आरक्षण मिळणार असेल तर उद्या राजीनामा देतो’, अशी भूमिका मांडली. तसेच देशमुखांना 50%च्या आतून आरक्षणाची भूमिका स्पष्ट नसल्याने मराठा बांधव नाराज झाले आणि निघून गेले.

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाबाहेर तीन आमदारांच उपोषण

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके, कैलास पाटील, राजू नवघरे या तीन आमदारांनी मुंबई मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.

यवतमाळमध्ये मराठा तरूणांचं जलसमाधी आंदोलन

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव गावातील 5 ते 6 तरुणांनी पैनगंगा नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले सुरू केले आहे. विदर्भात येणाऱ्या आणि मराठवाडा लगत असलेल्या उमरखेड महागाव येथील मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

अहमदनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील काष्टी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आंदोलनाला उपस्थित होता. या आंदोलनामुळे अहमदनगर दोंड महार्गावर दोन्ही बाजुने वाहतुक ठप्प झाली आहे.

साताऱ्यात मराठा विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : साताऱ्यात दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. ‘मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय पेपर देणार नाही’ अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. ’आरक्षण द्या,नाहीतर पेपर नाय’ या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे.

सोलापूरात एसटी सेवा मध्यरात्रीपासून बंद

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : राज्यभरात एसटीची तोडफोड आणि बस जाळल्याच्या घटनांमुळे सोलापूर एसटी डेपो मधून मध्यरात्रीपासून पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या आहेत.सोलापूर एस टी विभाग नियंत्रकांनी हा निर्णय घेतला आहे.कर्नाटकात एस टी बसेस पाठवू नयेत अशा सूचना तेथील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, तर खासगी वाहतूकदार वाढीव दर घेऊन प्रवाशांची लूट करतायत.

सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi :सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कार्यालयात उपस्थित असताना मुख्य प्रवेशद्वाराला आंदोलकांनी ठाळे ठोकले होते. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार असल्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

पंढरपूरात मराठा आरक्षणासाठी तरूणाने संपवलं जीवन

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथून एक धक्कादायक घटना आली आहे. मराठा आरक्षणासाठी तरूणाने भर चौकात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विलास क्षीरसागर असे मृत तरुणाचे नाव आहे. तरूणाने रात्रीच्या सुमारास हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नांदेडमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स, सरकारी गाडी जाळली

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा आंदोलकांनी नांदेडमध्ये हैदराबाद रोडवरील नायगाव आणि घुंघराळा येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे.यासोबत नायगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची शासकीय गाडी आंदोलकांनी जाळली.रात्री उशिरा काही आंदोलकांनी पंचायत समिती कार्यालयात ही गाडी जाळली.

चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा आरक्षणा संदर्भात सध्या राज्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरावर दगडफेक होऊ नये, तसेच अन्य प्रकार घडू नये या पार्श्वभूमी मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत उतरून अर्धनग्न आंदोलन

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कोल्हापुरातील पंचगंगा विहार मंडळाच्या वतीने आज पंचगंगा नदीत अर्धनग्न अवस्थेत उतरून आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून सकल मराठा समाज आरक्षण द्यावे यासाठी आंदोलन करते आणि मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करते असा आरोप करत कोल्हापुरातील पंचगंगा विहार मंडळांन हे अनोखा आंदोलन केले आहे.

धाराशिव जिल्ह्यात आजपासून संचारबंदी

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आक्रमक आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 144 (2) चे आदेश काढले असून 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. सदर संचारबंदीही शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, दुकाने व आस्थापना यांना लागू असणार आहे. यासोबत बीड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मंत्री, खासदार, आमदार यांच्या घरांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

 ‘जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत शाळा नाही’, फलटणमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन’

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : फलटण तालुक्यातील आसू गावातील असंख्य विद्यार्थ्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र तसेच ओबीसी प्रवर्गातून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्धार केला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सकाळी नऊ वाजता शाळेला न जाता आसू बसस्थानक येथे गावातील पहिली ते नववीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या विद्यार्थ्यांना जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत पाठवणार नसल्याचा निर्धार केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त – विजय वड्डेटीवार

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : सरकारला आव्हान करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे खोट्या आश्वासनामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झाली असल्याचा आरोप विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं आमच्या सरकारवर विश्वास नाही. सरकारने पायउतार झालं पाहिजे, हे सरकार असंविधानीक आहे.सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. सरकार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, याकडे आमचे लक्ष आहे, असे विजय वड्डेटीवार म्हणाले आहेत.

शाहु महाराज छत्रपती जरांगे पाटलांची भेट घेणार

Maratha Reservation, Manoj Jarange Patil Live updates in Marathi : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीने उग्र रुप घेतले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले असून, अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदारांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. त्यामुळे आता मंत्र्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT