खूपच चांगली बातमी! महाराष्ट्रात लवकरच कोसळणार धो-धो पाऊस.. अखेर मान्सून केरळात दाखल!
Monsoon Update 2026: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून (Southwest Monsoon) अखेर आज 4 June रोजी केरळमध्ये (Kerala) दाखल झाला आहे!
ADVERTISEMENT

मुंबई: देशभरातील नागरिकांना प्रतीक्षा असलेला नैऋत्य मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतपणे केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात होते. सुरुवातीला 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज होता. त्यानंतर 1 किंवा 2 जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांचा विलंब झाल्यानंतर अखेर 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला.
मान्सूनला अनुकूल वातावरण कसे तयार झाले?
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्रातील सक्रिय मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगांची घनता वाढली असून, त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्यक वातावरण तयार झाले आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?
दुसरीकडे अरबी समुद्रातही आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. या वाऱ्यांमुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला मदत झाली असून पुढील वाटचालीसाठीही ही परिस्थिती अनुकूल मानली जात आहे.
महाराष्ट्रात प्री-मान्सून पावसाची शक्यता
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही हवामानात बदल जाणवू लागला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्री-मान्सून सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.









