MPSC Result : एमपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम
एमपीएससीच्या या निकालात राज्यातून विनायक नंदकुमार पाटील हा तरूण प्रथम आला आहे.धनंजय वसंत बांगर हा तरूण दुसरा आला आहे आणि सौरव केशवराव गावंडे हा तरूण तिसरा आला आहे.
ADVERTISEMENT
MPSC result 2022 Declare : एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विनायक नंदकुमार पाटील या तरूणाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये राज्यातून अनिता विकास ताकभाते या तरूणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे आजच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि आजच एमपीएससीने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली होती. या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (mpsc result merit list 2022 rajyaseva exam result maharashtra)
ADVERTISEMENT
एमपीएससीच्या 613 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुलाखतीचा अंतिम टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि राज्य सेवा परिक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! बडोद्यात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली,12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा बुडून मृत्यू
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 18, 2024
हे वाचलं का?
एमपीएससीच्या या निकालात राज्यातून विनायक नंदकुमार पाटील हा तरूण प्रथम आला आहे.धनंजय वसंत बांगर हा तरूण दुसरा आला आहे आणि सौरव केशवराव गावंडे हा तरूण तिसरा आला आहे.मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते या तरूणीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिपा चांगदेव जेधे ही दुसरी आली आहे. सोनाली अर्जुनराव म्हात्रे ही तरूणी तिसरी आली आहे. एमपीएससीच्या या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हे ही वाचा : ‘धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मारहाण’, गैरवर्तन…, करूणा शर्माचे खळबळजनक आरोप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT