'सी माय ब^%$#', ते' फोटो पाठवून अशरफचे तरुणीला अश्लील मेसेज, म्हणाला; 'आता हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात'

मुंबई तक

Mumbai Crime News : मुंबईत 19 वर्षीय तरुणीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज व कॉल करून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Crime News
Mumbai Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'सी माय बनाना', फोटो पाठवून अशरफचे तरुणीला अश्लील मेसेज

point

म्हणाला; 'आता हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात'

Mumbai Crime News : मुंबईतील एका 19 वर्षीय तरुणीला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणी आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. पीडित तरुणी फेब्रुवारी 2026 मध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीत टेलीकॉलर म्हणून कामाला रुजू झाली होती. सुमारे 15 दिवसांनी साइट बंद झाल्यामुळे तिने नोकरी सोडली होती. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांशी तिची ओळख झाली होती. नोकरी सोडल्यानंतर त्या कंपनीतील अशरफ नावाच्या तरुणाने तिला अश्लील मेसेज करुन त्रास दिल्याचा तसेच शारिरीक संबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा करण्यात आलाय. 

संबंधित पीडित तरुणीला दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.15 वाजता तिच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव अशरफ असल्याचे सांगितले आणि तो तिच्या पूर्वाश्रमीच्या कंपनीत काम करत असल्याचेही नमूद केले. त्यानंतर त्याने सतत मेसेज करून तरुणीला ‘क्युट’ असल्याचे सांगत संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्याने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून अश्लील भाषेत संवाद साधण्यास सुरुवात केली. तरुणीने हा संवाद शेजारील मुलाच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवला असून, आरोपीने तिच्यासोबत लॉजवर जाऊन लैंगिक संबंध ठेवण्याची तसेच ओरल सेक्सची मागणी केल्याचे नमूद केले आहे.

वारंवार कॉल, फोटो व व्हिडिओ पाठवून त्रास

तक्रारीनुसार, आरोपीने दि. 22 एप्रिल रोजीही  वारंवार कॉल आणि मेसेज करून त्रास देणे सुरूच ठेवले. त्याने काही मुलींचे फोटो पाठवत त्यांच्यासोबत संबंध ठेवल्याचा दावा केला. तसेच स्वतःचा अश्लील फोटो पाठवून “सी माय बनाना” असा मेसेज केला. संबंधित फोटो पाहिल्यानंतर त्याने तो लगेच डिलीट केला, मात्र तरुणीने चॅटचे स्क्रीनशॉट जतन करून ठेवले आहेत. याशिवाय आरोपीने तिला अनेक अश्लील व्हिडिओ पाठवले आणि अयोग्य मागण्या केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने 'आता हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात', असा देखील मेसेज केलाय. 

त्यानंतर तरुणीने तिच्या ओळखीतील दोन सहकारी मैत्रिणींशी संपर्क साधला असता, त्यांनाही अशाच प्रकारचे मेसेज आणि कॉल आल्याचे समोर आले. त्यांनी आरोपीचा नंबर ब्लॉक केल्याचे सांगितले. मात्र, आरोपीकडून अश्लील मेसेज येणे दि. 23 एप्रिलपर्यंत सुरूच राहिल्याने तरुणीने वडिलांसह  पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 75, 78(2), 79 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?