Mumbai Mega Block: मुंबईकरांनो 'ते 63 तास', जम्बो मेगा ब्लॉकची A to Z माहिती!

मुंबई तक

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे (Central Railway) ने आज (30 मे) मध्यरात्रीपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. जाणून घ्या त्याबाबतची संपूर्ण माहिती.

ADVERTISEMENT

मध्य रेल्वेवरील जम्बो मेगा ब्लॉकची संपूर्ण माहिती!
मध्य रेल्वेवरील जम्बो मेगा ब्लॉकची संपूर्ण माहिती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत जम्बो मेगा ब्लॉक

point

मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक

point

मुंबईकरांचे होणार हाल

Mumbai Local Train Mega Block: मुंबई: मध्य रेल्वेवरील ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) या रेल्वे स्थानकांचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी (30 मे) मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक (Mega Block) तब्बल 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी कामानिमित्त बाहेर पडण्याआधी मेगा ब्लॉकमध्ये लोकल ट्रेनचं वेळापत्रक कसं असेल ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. (mumbai local train mega block mumbaikars that 63 hours a to z information of jumbo mega block)

मध्य रेल्वेने 63 तासांच्या मेगा ब्लॉकबाबत दिलेली माहिती जशीच्या तशी... 

दिनांक ३०/३१.५.२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते दि. ०२.६.२०२४ च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण/विस्ताराच्या संदर्भात मध्य रेल्वे ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक परिचालीत करणार आहे.

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या बसवण्याच्या प्लॅटफॉर्म १०/११ च्या विस्तारासंदर्भात नॉन इंटरलॉकिंग (NI) कामांसाठी ३६ तासांचा विशेष ब्लॉक चालवणार आहे. दि. ३०/दि. ३१.५.२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते दुपार दि.०२.६.२०२४ पर्यंत..

हे ही वाचा>> मुंबईकरांचे होणार 'मेगा' हाल; मध्य रेल्वेवर 63 तासांपर्यंत जम्बो ब्लॉक!

ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

अ. ब्लॉक १ - ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक (डाऊन जलद मार्गिका)
ब्लॉक दिनांक आणि कालावधी: दि. ३०/दि.३१.०५.२०२४ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) ००.३० वाजता ते दि. ०२.०६.२०२४ (रविवार दुपारी) १५.३० वाजेपर्यंत = ६३ तास

हे वाचलं का?

    follow whatsapp