मुंबईकरांचे होणार 'मेगा' हाल; मध्य रेल्वेवर 63 तासांपर्यंत जम्बो ब्लॉक!

रोहिणी ठोंबरे

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे (Central Railway) कडून आज मध्यरात्रीपासून ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकांत 63 आणि 36 तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यात 63 तासांचा ब्लॉक  

point

सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक  

point

930 लोकल फेऱ्या होणार रद्द

मुंबई : Central Railway Mega Block Update : देशात प्रथमच ज्या स्थानकांवर ट्रेन धावली त्या ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्थानकांचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी (30 मे) रात्रीपासून मेगाब्लॉक (Mega Block) लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईची ‘लाइफलाइन’ म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या सेवेवर आणि लाखो प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तसंच नागरिकांनी या विकेंडला प्रवासाचं नियोजन करूनच बाहेर पडलं पाहिजे. (mumbai central railway news update 63 hour mega block for platform widening at thane and csmt know dates and timing)

ठाण्यात 63 तासांचा ब्लॉक  

ठाणे येथून 30-31 मे च्या रात्री 63 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. हे 30-31 मे रोजी रात्री 12.30 ते 2 जून रोजी दुपारी 3.30  पर्यंत होईल. या कालावधीत ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 चे रुंदीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : दोन डॉक्टर निलंबित, डीनला सक्तीची रजा... पुणे अपघात प्रकरणात धडाधड कारवाई!

सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक  

तर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारासाठी 31 मेच्या रात्री (12.30) पासून 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 2 जून रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत असेल. तीन दिवस चालणाऱ्या या कामामुळे लोकल गाड्यांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कमी होणार आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्या पनवेल स्थानकातून सुटतील. मेगाब्लॉकमुळे, बहुतांश लोकल ट्रेन सीएसएमटी ऐवजी दादर किंवा भायखळा येथे थांबतील.

हेही वाचा : महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला?

930 लोकल फेऱ्या होणार रद्द

मध्य रेल्वे मुंबई विभागाचे डीआरएम रजनीश कुमार गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेगाब्लॉकमुळे तीन दिवसांत 930 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. 930 लोकल सेवांपैकी शुक्रवारी 161, शनिवारी 534 आणि रविवारी 235 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp