Exit Poll 2024 : महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला? यंदाचा काय अंदाज?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maharashtra lok sabha election exit poll 2024 loksabha election 2019 exit poll and result difference maha vikas aghadi and mahayuti
एक्झिट पोलकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election Exit Poll 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार परडतेय. यातील सहा टप्प्यातील मतदान आतापर्यंत पार पडले आहे. तर सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. हे मतदान पार पाडल्यानंतर लगेचचं संध्याकाळी एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) आकडे समोर येणार आहे. त्याचवेळेस महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha) एक्झिट पोलही समोर येणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. पण 2019  साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे आकडे किती अचूक ठरलेले, हे जाणून घेऊयात. (maharashtra lok sabha election exit poll 2024 loksabha election 2019 exit poll and result difference maha vikas aghadi and mahayuti) 

2019 च्या एक्झिट पोलचे आकडे
2019 चा एक्झिट पोल  एनडीए  युपीए
आज तक अ‍ॅक्सिस माय इंडिया  38-42  6-10 
इंडिया टीव्ही सीएनएक्स   34   14
टाइम्स नाऊ वीएमआर 38 10
एबीपी सी व्होटर सर्वे 34 14 

हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha : महायुतीच्या 20 जागा धोक्यात, 'या' चुका भोवणार?

आज तक अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या (Aaj Tak Axix My india)  एक्झिट पोलनुसार (भाजप-शिवसेना) एनडीएला 38 ते 42 जागा तर (काँग्रेस-राष्ट्रवादी) युपीएला 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज होता. इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या (India TV CNX) एक्झिट पोलनूसार,  एनडीएला  34 जागा आणि युपीएला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. टाइम्स नाऊ वीएमआरच्या (Times NOW VMR) एक्झिट पोलनुसार एनडीएला 38 जागा तर युपीएला 10  जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एबीपी सी व्होटर (ABP C-Voter Survey) सर्वेंनुसार एक्झिट पोलमध्ये एनडीएला 34 जागा, युपीएला 14 जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला होता.

2019 च्या लोकसभेचा निकाल? 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे एनडीएला 41 जागा जिंकता आल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि काँग्रेसला 1 म्हणजेचे युपीएने 5 जागा जिंकल्या होत्या. तर एमआयएम-वंचितने 1 जागा, अपक्षने 1 जागा जिंकली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : नवनीत राणांची निकालाआधीच वाढली चिंता; अमरावतीबद्दल मोठी अपडेट

एक्झिट पोल ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये काही मतदारांना विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे जनतेने कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोल निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी होतात, जेव्हा मतदान संपते आणि मतदार मतदान केंद्राबाहेर येतात.याद्वारे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावला जातो. एक्झिट पोल पक्षांना आणि राजकीय विश्लेषकांना निवडणुकीचा कल समजण्यास मदत करतात. या मतदानाच्या आधारे, माध्यमे निवडणुकीच्या निकालांचे अंदाज वर्तवतात.कधी कधी हे अंदाज अगदी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे, परंतु अनेक वेळा हे अंदाज चुकीचेही ठरले आहेत आणि असे होण्याची शक्यता नेहमीच असते. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT