Maharashtra Lok Sabha : महायुतीच्या 20 जागा धोक्यात, 'या' चुका भोवणार?

मुंबई तक

Maharashtra Lok Sabha election 2024 Mahayuti Seats : संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असून, भाजप प्रणित महायुतीला किती जागा मिळणार यावर बहुमताचं बरंच गणित अवलंबून असणार आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात महायुतीला २० जागांचा फटका बसेल, असा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र

point

महायुतीला २० जागांचा फटका बसण्याचा अंदाज

point

भाजपला कोणत्या चुका भोवणार?

Mahayuti Maharashtra Lok Sabha 2024 : सध्या जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे, ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. दहा वर्ष सत्तेत राहिलेले मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार का? एनडीए 400 जागा जिंकणार का? काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं काय होणार? अशा बऱ्याच प्रश्नांभोवती चर्चांनी फेर धरला आहे. (There is a Prediction that 20 seats of the Mahayuti will be reduced in the Lok Sabha elections in Maharashtra. What are its reasons?)

४ जून रोजी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण या सगळ्यांत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय की, महाराष्ट्राचा कौल कुणाला असणार? राजकीय, सामाजिक प्रचंड उलथापालथ झालेल्या महाराष्ट्रात काय होणार याची उत्सुकता आहे. अशात महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे, असे राजकीय विश्लेषक, निवडणूक अभ्यासक आणि सट्टा बाजाराचाही अंदाज आहे. पण, हे असं का घडले याबद्दलची कारणे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

भाजप-महायुतीला 20 जागांचा फटका बसणार?

राजकीय अभ्यासक आणि विश्लेषकांकडून महायुतीच्या जागा घटण्याचं कारण दिलं जात आहे, ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस.

हेही वाचा >> "महायुतीला 20 जागांचा फटका, मविआला...", यादवांनी वाढवलं भाजपचं टेन्शन 

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी जे ओपिनियन पोल आले, त्यातही महायुतीतील या दोन्ही पक्षामुळे महायुतीच्या जागा घटतील, असे अंदाज काही पोलने मांडले. पण, आता मतदान झाल्यानंतर राजकीय विश्लेषक महायुतीला २० जागांचा फटका बसेल, असं सांगत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp