Maharashtra Lok Sabha : नवनीत राणांची निकालाआधीच वाढली चिंता; अमरावतीबद्दल मोठी अपडेट

सौरभ वक्तानिया

Satta Bazar Prediction : सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील अनेक जागांच्या निकालाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये अमरावती लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. यानुसार अमरावतीची जागा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा नवनीत राणा आणि भाजपला मोठा फटका आहे.

ADVERTISEMENT

अमरावती लोकसभा मतदार संघात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज सट्टा बाजाराने (Satta Bazar) वर्तवला आहे.
satta bazar prediction on lok sabha elction 2024 amaravati lok sabha navneet rana bjp balwant wankhade congress bachhu kadu dinesh boob prahar
social share
google news

Satta Bazar Prediction on Amravati Lok Sabha : राज्यात पाच टप्प्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान पार पडले आहे. आणि येत्या 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी निकालाआधी अनेक अंदाज बांधले जातायत. यामध्ये अमरावती लोकसभा मतदार (Amravati Lok Sabha)  संघात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज सट्टा बाजाराने (Satta Bazar) वर्तवला आहे. अमरावतीतून भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव होण्याचं भाकित सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे.  (satta bazar prediction on lok sabha elction 2024 amaravati lok sabha navneet rana bjp balwant wankhade congress bachhu kadu dinesh boob prahar) 

सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील अनेक जागांच्या निकालाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये अमरावती लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. यानुसार अमरावतीची जागा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा नवनीत राणा आणि भाजपला मोठा फटका आहे. कारण नवनीत राणा यांनी यावेळची निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढली होती. तरीही त्यांना अमरावती जिंकता आली नाही. 

हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha : महायुतीच्या 20 जागा धोक्यात, 'या' चुका भोवणार?

खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे महायुतीतील बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला असलेला विरोध आहे. आणि दुसरं म्हणजे याच जागेवर कडूंनी त्यांचा उमेदवार दिनेश बूब यांना निवडणूकीच्या उतरवले होते. यामुळे मतात फुट होण्याची मोठी शक्यता होती. 

किती टक्के मतदान झाले? 

अमरावती  67.67 टक्के 
बडनेरा रवी राणा (युवा स्वाभिमान पार्टी) 55.78  टक्के 
अमरावती सुलभा खोडके (काँग्रेस) 57.52 टक्के 
तिवसा  यशोमती ठाकूर  (काँग्रेस) 64.16 टक्के 
दर्यापूर बलवंत वानखडे (काँग्रेस) 66.88 टक्के 
मेळघाट राजकुमार पटेल (प्रहार)  71.55 टक्के 
अचलपूर बच्चू कडू (प्रहार)  68.84 टक्के 

हे वाचलं का?

    follow whatsapp