Pune Accident: दोन डॉक्टर निलंबित, डीनला सक्तीची रजा... पुणे अपघात प्रकरणात धडाधड कारवाई!

रोहिणी ठोंबरे

Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारने रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले आहे. याशिवाय डीन डॉ.विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीच्या डीनकडे रूग्णालयाची जबाबदारी

point

सुषमा अंधारेंनी व्यक्त केली सुरक्षेबाबत चिंता

point

जेजे बोर्डाचीही होणार कसून चौकशी ?

पुणे : Pune Porsche Car New Update : पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारने रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले आहे. आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यात हेराफेरी केली होती. या खुलाशानंतर दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉ.विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, त्यांचा अतिरिक्त कार्यभार डॉ.चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (pune porsche car accident dmer sends sassoon hospital dean on compulsory leave)

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे यांनी रजेवर जाण्यापूर्वी सांगितले की, 'डॉ. अजय तावरे यांना अटक केल्यानंतर तत्काळ निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला होता, तर अस्थायी रूपात कार्यरत असलेले डॉ. श्रीहरी हळनोर यांची सेवा 28 मे रोजी संपवण्यात आली.' ते म्हणाले, "निलंबनाची कारवाई राज्य सरकारच्या पातळीवर केली जाते. आम्ही आमच्या बाजूने प्रस्ताव पाठवला होता. कारवाईही झाली आहे."

हेही वाचा : महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला?

डीन म्हणाले होते, "अटकेनंतर आम्ही डॉ. अजय तावरे यांच्याकडून फॉरेन्सिक मेडिसिनच्या एचओडीचा पदभार घेतला आणि तो विभागातील वरिष्ठ प्राध्यापकांना दिला. डॉ. श्रीहरी हळनोर यांची सेवा तात्पुरती होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी अतुल घाटकांबळे हा स्वच्छता कर्मचारी असून त्याने आरोपीचे रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये फेकले होते.'

बारामतीच्या डीनकडे रूग्णालयाची जबाबदारी

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या शिफारशीवरून फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.अजय तावडे आणि ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp