VIDEO: पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला अन् चिमुकलीचा जीवच गेला!
Mumbara dog fell down CCTV: मुंब्य्रात एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा हा थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला. ज्यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंब्य्रात पाच मजली इमारतीवरून कुत्रा पडला, तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
घटनेचा सीसीटीव्ही आला समोर
काळीज पिळवटून टाकणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद
Mumbra cctv video dog fell down: मुंब्रा: मुंबईच्या नजीक ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील अमृत नगर येथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कुत्रा थेट रस्त्यावरून जाणाऱ्या तीन वर्षांच्या एका चिमुकलीवर पडला. ज्यामध्ये त्या चिमुकलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वांनाच सुन्न करणाऱ्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे. जी दृश्य पाहून आपलंही काळीज पिळवटून जाईल. (mumbra cctv video dog fell from the fifth floor and 3 year old child lost his life)
ADVERTISEMENT
कुत्रा अंगावर पडला अन् चिमुकलीनं जीव गमावला
मुंब्य्रातील चिराग मॅन्शन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एक कुत्रा थेट खाली पडला. पण त्याचवेळी त्याच इमारतीच्या खालून जाणाऱ्या एका चिमुकलीच्या अंगावर तो पडला. हा हादरा एवढा भयंकर होता की, तीन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वेदनादायक घटनेबाबत स्थानिकांनी माहिती देताना सांगितलं की, हा अपघात काल (6 ऑगस्ट 2024) दुपारी 4.30 च्या सुमारास घडला.
हे ही वाचा>> Pimpari Chinchwad Video : बाहुली घेऊन खेळत होती, अंगावर लोखंडी गेट पडला अन्...चिमुकलीसोबत काय घडलं?
इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडलेल्या पाळीव कुत्र्याच्या मालकाचे नाव झैद सय्यद असे आहे. तो मुंब्रा येथील अमृत नगर येथील चिराग मॅन्शन येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का?
या घटनेच्या समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचानक हा कुत्रा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली रस्त्यावर पडताना दिसतो आणि त्याच वेळी एक महिला तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिथून जात असते. तेव्हाच कुत्रा हा तिच्या मुलीच्या अंगावर पडतो. या घडलेल्या प्रकाराने महिला प्रचंड हादरून जाते आणि ती आपल्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला उचलून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेली. पण रुग्णालयात पोहचण्याआधीच मुलीचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
हे ही वाचा>> पंढरीच्या वारीत घडला चमत्कार! दिंडीत चुकला पण... 250 किमी प्रवास करत घरी पोहचला श्वान!
दरम्यान, या घटनेत कुत्राही जखमी झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असंही दिसतं आहे की, कुत्रा जेव्हा मुलीवर पडल्यावर तेव्हा त्याला देखील काही प्रमाणात मार लागला. पण काही मिनिटातच कुत्रा जागेवरून घसरत घसरत रस्त्याच्या एका बाजूला झाला. याच घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी मुजना यांनी या कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं.
ADVERTISEMENT
या संपूर्ण प्रकरणानंतर हा कुत्रा थेट पाचव्या मजल्यावरून रस्त्यावर कसा पडला. त्याने स्वत:हून उडी मारली की त्याला कोणी इमारतीवरून ढकलून दिलं.. या सगळ्याचा तपास आता मुंब्रा पोलीस कसून करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT