Nanded : आठपानी सुसाईड नोट, चार नेत्यांची नावे; गळफास लावून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

nanded farmer commit suicide wrote 8 page suicide note say sorry to family nanded news
nanded farmer commit suicide wrote 8 page suicide note say sorry to family nanded news
social share
google news

Nanded Farmer Suicide : नांदेडच्या कळंबमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ‎‎अण्णासाहेब केरबा‎‎काळे (48) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने आठपानी सुसाईड नोट लिहून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. ”मुलगा आकाश, मुलगी मई चांगले राहा. मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही, मला माफ करा”असे सुसाईड नोटमध्ये लिहून अण्णासाहेब यांनी आत्महत्या केली आहे. ही सुसाईड नोट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने नांदेडमध्ये खळबळ माजली आहे.(nanded farmer commit suicide wrote 8 page suicide note say sorry to family nanded news)

ADVERTISEMENT

कळंब तालुक्यातील पिंपळगाव‎‎ येथील शेतकरी अण्णासाहेब केरबाकाळे यांची दोन एकर जमीन आहे. या जमीनीवर ते फुल शेती करायचे. मात्र ही शेती धोक्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावरच त्यांनी फुल फेकून दिली होती. त्यात सावकाराचे कर्ज चुकवलं नाही आणि मुलीच्या लग्नाचा विचार या विवंचनेतून अण्णासाहेब यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती.सोमवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती. कांबळे यांच्या पश्चात मुलगी, मुलगा आई दोनभाऊ असा परिवार आहे.

हे ही वाचा : Ram Temple : “राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला येऊ नका”, अडवाणी-जोशींना का करण्यात आली विनंती?

दरम्यान आत्महत्येपुर्वी कांबळे यांनी आठपानी सुसाईड नोट लिहली होती. या सूसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले आहे. कर्जबारी झालो आहे, सावकाराचा त्रास, कारखान्याने उचल दिली नाही, कुणी आधार दिला नाही असे अनेक मुद्दे त्यांनी सुसाईड नोटमध्ये मांडले आहेत. तसेच मुलगी लग्नाला आली आहे. लग्न कसे करायचे होते, याचा विचार मी करत होतो. मी निराश झालो आहे. भाऊबंदकीची माफी मागतो. बापू मई (मुलगी) च्या लग्नाची जबाबदारी तुमच्यावर आहे. पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, राष्ट्रवादीचे प्रा. श्रीधर भवर यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी हात जोडून विनंती अण्णासाहेब यांनी पत्रातून केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी: ऐका dawood ibrahim ची Exclusive ऑडिओ क्लिप, दाऊदने नेमकं काय मागवलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT