Maratha Reservation : ‘मी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि…”, शरद पवारांनी बोलून दाखवली भीती

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sharad Pawar concerns on Manoj jarange health and law and order of maharashtra
Sharad Pawar concerns on Manoj jarange health and law and order of maharashtra
social share
google news

Sharad Pawar on Manoj Jarange Hunger Strike : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा उग्र बनला आहे. राज्यात ठिकठिकाणी नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आंदोलक आक्रमक होताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. पण, लांबवला आणि आता महाराष्ट्रात वणवा पेटेल की, काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. यावेळी पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याचाही उल्लेख केला. (Sharad Pawar express concerns on Maratha Reservation and Manoj jarange hunger strike)

ADVERTISEMENT

मुंबईत राजकीय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शरद पवारांनी दोन तीन मुद्द्यांवर भूमिका मांडली. यात एक मुद्दा होता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आरक्षण. या मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवलं.

शरद पवार मराठा आरक्षण आंदोलनावर काय बोलले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख आता केला आणि ज्या कामासाठी पक्षाचे अध्यक्ष (जयंत पाटील) आता गव्हर्नरांकडे गेले तो एक आरक्षणाचा प्रश्न. यापूर्वी चर्चा झाली होती व निर्णय सुद्धा घेतला होता. दुर्दैवाने कोर्टामध्ये वेगळी भूमिका ही घेतली गेली आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्याची इच्छा होती. आज त्या संबंधी उपोषण जालना जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांनी केलं.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> Manoj Jarange : ‘नागपूरच्या कोतवालाकडे जरांगेंचे प्राण…’, फडणवीसांवर सेनेचा UBT घणाघात

महाराष्ट्रात वणवा पेटेल अशी स्थिती -शरद पवार

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, “मी स्वतः पहिल्यांदा त्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. त्यांच्या मागण्या काय ते समजून घेतलं. त्यातून मार्ग कसा काढता येईल? त्या संबंधी विचारविनिमय केला. दुर्दैवाने राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने काही निकाल घ्यायची आवश्यकता होती ती लांबवली. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा वणवा पेटेल की काय या प्रकारची एक स्थिती निर्माण झाली”, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> Andhra Pradesh Train Accident: रेल्वे धडकल्या… 13 प्रवाशांचा मृत्यू, भयंकर अपघाताचं कारण आलं समोर

“पक्ष म्हणून सुद्धा स्वच्छ भूमिका आहे की जे काही जरांगे पाटील करत आहेत, जी काही त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे. ती करत असताना दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातून काही आपल्याला काढून घ्यायचं नाही. त्यांच्या ताटातलं आहे ते तिथेच राहिलं पाहिजे. आज जी काही मागणी या मराठा समाजाने केलेली आहे त्याची पूर्तता ही योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल मांडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT