गुलेन बॅरी सिंड्रोम: पुणेकरांना भरली धडकी, 'हा' आजार आहे तरी काय?

मुंबई तक

Guillain-barre-syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोम याचे पुण्यात रुग्ण सातत्याने वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ (फोटो सौजन्य: AI)
पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ (फोटो सौजन्य: AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या ६७ वर पोहोचली

point

या आजाराची लक्षणे जाणून घ्या

point

बहुतेक रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे होतात

पुणे: पुणे शहरात गुलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. गुरुवारी पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे 8 संशयित रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 67 झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला 24 संशयित रुग्ण आढळल्यानंतर संसर्गात अचानक वाढ झाली. ज्याच्या चौकशीसाठी राज्य आरोग्य विभागाने मंगळवारी रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) स्थापन केली आहे.

खरं तर, गुलेन-बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे शरीरात अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात. यामध्ये हातपायांमध्ये तीव्र कमकुवतपणा, अतिसार इत्यादींचा समावेश आहे. डॉक्टरांच्या मते, बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस होतो. कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतं.

हे ही वाचा>> Maharashtra Bandhara Blast : भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट, दूरपर्पयंतचा परिसरा हादरला...

पीटीआयच्या वृत्तानुसार, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जीबीएस हा मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळतो. पण यामुळे साथीचा रोग होण्याचा धोका नाही. बहुतेक रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे होतात. या आजारात मृत्युदर खूपच कमी आहे त्यामुळे लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही.

गुलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे हळूहळू दिसून येतात आणि त्यात हे समाविष्ट असू शकते:

  1. अशक्तपणा आणि मुंग्या येणे: सहसा पायांपासून सुरू होते आणि हात आणि चेहऱ्यावर पसरते.
  2. स्नायू कमकुवत होणे: उभे राहणे, चालणे किंवा वस्तू उचलणे यात अडचण येणे.
  3. श्वास घेण्यास त्रास: जर स्थिती गंभीर झाली तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
  4. हृदय गती आणि रक्तदाबात अडथळे: अनियमित हृदय लय आणि कमी किंवा उच्च रक्तदाब.
  5. चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम: चेहऱ्याच्या स्नायू कमकुवत होणे.
  6. चालण्यास असमर्थता: गंभीर प्रकरणांमध्ये, हालचाल करण्यास पूर्णपणे असमर्थता.

पुण्यात १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर

"जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 67 झाली आहे, ज्यामध्ये 43 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश आहे. यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत," असे पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

हे ही वाचा>> इअरफोन घालणं जीवावर बेतलं.. 16 वर्षांच्या मुलीचा कसा गेला जीव?

दरम्यान, सिंहगड रोड परिसरातील बाधित भागात आरआरटी आणि पीएमसी आरोग्य विभागाने देखरेख सुरू ठेवली. आरआरटीमध्ये राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांडले, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, बीजे मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, राज्य साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. भालचंद्र प्रधान आणि इतरांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp