संतापजनक! नराधमाने अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेलं अन्...
Pune Crime News : ग्रामीण पुण्यातील दौंडमध्ये अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना दौंडमधील कुरकुंभ येथे घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ग्रामीण पुण्यातील दौंडमध्ये अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

ही घटना दौंडमधील कुरकुंभ येथे घडली आहे.
Pune Crime : ग्रामीण पुण्यातील दौंड तालुक्यात एका पाच वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनं ग्रामीण पुणे हादरून गेलं आहे. ही घटना दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात घडली आहे. या घटनेने चिंता व्यक्त होत आहे. हैवानी कृत्य करणाऱ्या नराधमाचे नाव नवनाथ चंद्रकांत रिठे (वय 27) फलटण तालुक्यातील शेरोचीवाडी येथील होता. त्या व्यक्तीला दौंड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : पाकिस्तानची गुप्तेहर.. 'ती' महिला पोलिसांच्या ताब्यात, कोण आहे ज्योती मल्होत्रा?
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 16 मे 2025 दिवशी दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची साडेपाच वर्षांची अल्पवयीन चिमुकली ही पुणे सोलापूर हायवेनजीक असणाऱ्या एका किराणा दुकानाच्या समोर उभी होती. अशावेळी आरोपी नराधमाने तिचं अपहरण केलं.
त्यानंतर त्या लहान मुलीला एका उसाच्या शेतात नेलं आणि तिच्यावर आत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अशावेळी आरोपीने पीडित लहान मुलीच्या अंगावरील कपडे काढत तिला मारहाण केली. अशावेळी मुलीने आरडाओरड करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. यानंतर या घटनेची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : रोहित शर्माच्या आई वडिलांनी केलं स्टँडचं उद्घाटन; पत्नी रितिकाचे डोळे पाणावले, Video Viral
मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फर्यादीत घडलेली एकूण माहिती नमूद केली आहे. ज्यात अल्पवयीन मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गाजवळ असणाऱ्या कुरकुंभ येथील एका भागवत किराणामालाच्या दुकानाजवळ उभी होती. अशावेळी आरोपी चंद्रकांतने तिचे अपहरण केलं. त्यानंतर तिला दौड तालुक्यातील मळद गावातील एका उसाच्या शेतात नेलं. त्यानंतर तिच्यावर आत्याचार केल्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांना नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.