रोहित शर्माच्या आई वडिलांनी केलं स्टँडचं उद्घाटन; पत्नी रितिकाचे डोळे पाणावले, Video Viral
Rohit Sharma : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचे स्टँड उभारण्यात आले. या स्टँडचे उद्घाटन हे रोहित शर्माच्या आई वडिलांनी केलं आहे. हे सर्व पाहून पत्नी रितिकाला अश्रू अनावर झाले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचे स्टँड उभारण्यात आले.

रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन हे त्याच्या आई वडिलांनी केलं आहे.

उद्घाटनादरम्यान, रोहित शर्माच्या पत्नीला अश्रू अनावर झाले आहेत.
Rohit Sharma : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचे स्टँड उभारण्यात आले. रोहित शर्मा स्टँड उद्घाटनाचा कार्यक्रम हा 17 मे 2025 दिवशी झाला. या स्टँडचे उद्घाटन हे रोहितच्या आई वडिलांनी केलं आहे. याहून अधिक आनंददायी क्षण शोधून कुठेच सापडणार नाही. आपल्या लेकाने क्रिकेट विश्वात केलेलं काम ही त्याच्या कष्टाची आणि कामाची पर्वनी आहे. अशावेळी रोहितची अर्धांगीनी रितिका सजदेहलाही अश्र अनावर झाले आहेत. या क्षणाचे अनेक व्हिडिओज् हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
हेही वाचा : बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!
रोहित शर्मा हा दिलसे मुंबईकर आहे. तो उत्तम मराठीही बोलतो हे अनेकदा पाहिलंही आहे. त्याच्या क्रिकेटची जडणघडणही याच मुंबईत झाली. त्यामुळे वानखेडे स्टेडियमला होम ग्राऊंड असं बोललं जातं. तर रोहित शर्माला मुंबईचा राजा म्हणत त्याचे फॅन्स त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात.
पत्नी रितिकाला अश्रू अनावर
वानखेडे स्टेडियमध्ये रोहित शर्मा स्टँड नावाने पॉव्हेलियन बांधण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटनसोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. अशावेळी रोहित शर्माचे कुटुंबही त्या ठिकाणी आले होते. रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन करताना रोहितने आपल्या आई वडिलांच्या हाताला धरून स्टेजवरती घेऊन आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोहित शर्माची आई, त्याचे वडील आणि रोहित शर्माने उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर हे सर्व पाहून रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहला अश्रू अनावर झाले.
हेही वाचा : बीडमध्ये आकाचा आणखी एक 'आका' तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं...
रोहित शर्माबरोबरच शरद पवार आणि अजित वाडेकर यांच्या नावाचे पॉव्हेलियन स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ते म्हणाले की, रोहित शर्मा खेळत असताना त्याच्या नावाचं स्टँड उभारण्यात आलं आहे. तो भाग्यवान आहे. तो खर्या अर्थाने पात्रतेचा आहे. तो अजूनही खेळेल. तो अधिक चांगला खेळ दाखवेल असा माझा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं.