बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!

मुंबई तक

Beed crime News : वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाच्या गँगने शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला मारहाण केली आहे. या गँगमध्ये एक दोन नाहीतर तब्बल 12  जणांचा समावेश होता. त्यातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

ADVERTISEMENT

Beed crime News Walmik Karad Closest Arrested In Shivraj Diwate Case
Beed crime News Walmik Karad Closest Arrested In Shivraj Diwate Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडमध्ये आणखी एका तरुणाला मारहाण करण्यात आली.

point

हल्लेखोर करणाऱ्या गँगचा मुख्य हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे.

point

हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Beed crime News : बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला. या घटनेला काही महिने उलटल्यानंतर मध्यंतरी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असणाऱ्या खोक्याने एका तरुणाला मारहाण केली. त्यात धसांच्या कार्यकर्त्याला अटक झाली आहे. त्यानंतर आता बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. आता वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाच्या गँगने शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला मारहाण केली आहे. या गँगमध्ये एक दोन नाहीतर तब्बल 12  जणांचा समावेश होता. त्यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा :  बीडमध्ये आकाचा आणखी एक 'आका' तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं...

नेमकं काय होतं प्रकरण? 

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गित्ते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने एका शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला मारहाण केली आहे. शिवराज हा लिंबुटा येथील आहे. त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आले आणि त्याला मारहाण केली. शिवराजला जीवे मारण्याचा गोट्या गँगचा कट असल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसतं की, पीडित तरुण हा जीवाच्या आकांताने ओरडत आहे. त्याला लाठ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली जात आहे. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली आहे. ही घटना अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान घडली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp