Indian Army मध्ये बंपर भरती, कोणतीही परीक्षा नाही थेट Interview! पगार तब्बल...
भारतीय सेनेकडून टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स (TGC 142)- जानेवारी 2026 साठी अर्जाची प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार 29 एप्रिल 2025 च्या दुपारी 3:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. कसा भराल अर्ज?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 इंडियन आर्मीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
 
 थेट इंटरव्ह्यू मार्फत सिलेक्शन
 
 काय आहे अर्जाची प्रक्रिया?
Indian Army Recruitment 2025: आपल्यापैकी अनेकांचं इंडियन आर्मी मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असतं. इंडियन आर्मी कडून बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय सेनेकडून टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स (TGC 142)- जानेवारी 2026 साठी अर्जाची प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार 29 एप्रिल 2025 च्या दुपारी 3:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी joinindianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरणं अनिवार्य आहे.
टेक्निकल ग्रेजुएट कोर्स (TGC-142) 2026 साठी पात्रता
शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्यासाठी, उमेदवार अविवाहित पुरुष असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे B.E./B.Tech पदवी असावी किंवा ते अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनियरिंगच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी असायला हवेत.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 20 ते 27 वर्षे (2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले) अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये थेट SSB मुलाखत असेल. यामध्ये लेखी परीक्षा होणार नाही.
यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना भारतीय सैन्य अॅकॅडमी, डेहराडून मध्ये प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी पाठवण्यात येईल. नंतर त्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळेल. ही संधी अशा इंजीनियरिंगच्या पदवीधरांसाठी आहे ज्यांना भारतीय सैन्याचा भाग बनून अभिमानाने देशाची सेवा करायची आहे.














