Video फक्त बघतच राहा..'या' खेळाडूने पकडला क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच!

मुंबई तक

Ben Foakes Catch Viral Video, Yorkshire vs Surrey : इंग्लंड क्रिकेट टीममधून बाहेर पडलेला अनुभवी विकेटकीपर खेळाडू बेन फोक्सने काऊंटी DIV1 च्या 28 व्या सामन्यात एक जबरदस्त झेल पकडला.

ADVERTISEMENT

Best Catch In Cricket History Video Viral
Best Catch In Cricket History Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बेन फोक्सने पकडलेल्या झेलची क्रिकेट विश्वात तुफान चर्चा

point

जॉनी बेअरस्टोने संघासाठी केल्या सर्वाधिक धावा

point

फोक्सने टीपलेल्या झेलचा व्हिडीओ पाहून थक्कच व्हाल

Ben Foakes Catch Viral Video, Yorkshire vs Surrey : इंग्लंड क्रिकेट टीममधून बाहेर पडलेला अनुभवी विकेटकीपर खेळाडू बेन फोक्सने काऊंटी DIV1 च्या 28 व्या सामन्यात एक जबरदस्त झेल पकडला. फोक्सच्या अप्रतिम झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, टॉम लॉजच्या 33 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज जोनाथन टॅटरसॉलने लेग साईडला मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु, चेंडू आणि बॅटमध्ये योग्य कनेक्शन न झाल्याने चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला उडाला. त्यानंतर फॉक्सने चेंडूच्या दिशेनं धाव घेत उडी मारली अन् जबरदस्त झेल पकडला. फॉक्सच्या उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणामुळे फलंदाज जोनाथनला पॅव्हेलियनमध्ये परत जावं लागलं. बाद होण्याआधी यॉर्कशायरचा फलंदाज जोनाथन टेटरसॉलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून एकूण 38 चेंडूंचा सामना केला. याचदरम्यान, 21.05 च्या स्ट्राईक रेटने त्याने अवघ्या 8 धावा केल्या.

हे ही वाचा >> बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!

जोनाथन बाद झाल्यानंतर त्याच्या संघाचा स्कोअर 33 षटकांच्या समाप्तीनंतर तीन विकेट्स गमावून 87 धावांवर पोहोचला होता. यॉर्कशायरचा संघ लंडनमध्ये नाणेफेक हरल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये 80.4 षटकात 255 धावांवर गारद झाला. यॉर्कशायरसाठी पहिल्या इनिंगमध्ये जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक धावा केल्या.

इथे पाहा क्रिकेट इतिहासातील सर्वात जबरदस्त झेल

जॉनीने 114 चेंडूंचा सामना करत 89 धावांची खेळी केली. या इनिंगमध्ये 13 चौकारांचा समावेश आहे. प्रतिस्पर्धी संघाकडून 256 धावांचं लक्ष्य गाठत असताना संघाने 13 षटकांमध्ये बिनबाद 49 धावा केल्या आहेत. कर्णधार रोरी बन्सने 53 चेंडूत  27 धावा केल्या. तर डोमिनिक सिबली 27 चेंडूत फक्त 10 धावा करून नाबाद आहे.

हे ही वाचा >> Personal Finance: EMI च्या भीतीमुळे तुम्ही घेत नाही स्वत:चं घर? 'हा' फॉर्म्युला वापरा अन् घ्या हक्काचं घर!

हे वाचलं का?

    follow whatsapp