भारतातील 'इथल्या' महिला करू शकतात 4 लग्न, फिरायला आलेले पर्यटक तर...
आपल्या भारतात एकाहून अधिक लग्न करणं गैर मानलं जातं, पण भारताच्या या गावातील महिलांना 4 लग्न करण्याची परवानगी असल्याचा दावा केला जातो. नेमकी काय आहे ही प्रथा?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 भारताच्या 'या' गावातील महिला करु शकतात 4 लग्न
 
 4 लग्न करण्याची नेमकी कोणती प्रथा?
 
 ही प्रथा कोणत्या गावात पाळली जाते?
आपल्या भारताच्या शहरातील बऱ्याच गावांची अगदी थक्क करणारी वैशिष्ट्ये आपण पाहतो किंवा ऐकतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे खूपच वेगळी आणि अनोखी प्रथा आजही पाळली जाते. खरंतर, आपल्या भारतात एकाहून अधिक लग्न करणं गैर मानलं जातं, पण भारताच्या या गावातील महिलांना 4 लग्न करण्याची परवानगी असल्याचा दावा केला जातो. नेमकी काय आहे ही प्रथा? सविस्तर जाणून घ्या.
कोणतं गाव?
हिमाचल प्रदेशातील सांगला शहरापासून 28 किमी दूर असलेल्या 'छितकुल'गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या गावातील महिलांना 4 लग्न करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असल्याचं दावा केला जातो. असं करणं या गावात अजिबात गैर मानलं जात नाही.
गावाची जुनी परंपरा
खरंतर, कोणत्या गावात महिलांना चक्क 4 लग्न करण्याची परवानगी कशी काय मिळू शकते? मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की छितकुल गावात ही प्रथा बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे.

महिला करतात 4 लग्नं मात्र सात फेरेही घेत नाहीत!
छितकुल गावाच्या परंपरेनुसार, तिथल्या महिला 4 लग्न करु शकतात मात्र, या गावातील लग्नांमध्ये सात फेरे घेतले जात नाहीत तर बळी दिला जातो. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा महिलेला तिच्या एका पतीसोबत एकांतात राहायचं असल्यास तेव्हा तो पती खोलीच्या बाहेरील दरवाजावर त्याची टोपी ठेवतो जेणेकरुन दुसरा पती ते पाहून हस्तक्षेप करु शकणार नाही.














