कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळ धडकणार! 'या' भागात कोसळणार पावसाच्या सरी
Maharashtra Weather Today : भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि इतर हवामान संस्थांनी 18 मे 2025 साठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 राज्यात कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?
 
 या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी
 
 आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि इतर हवामान संस्थांनी 18 मे 2025 साठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. आज महाराष्ट्रात मिश्र स्वरुपाचं हवामान असू शकतं. राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकतं.
कोकण आणि गोवा
कोकण पट्ट्यात, विशेषत: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे 18 मे रोजी आंशिक ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. दरम्यान, मुंबईत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस राहू शकतं. आर्द्रता 70 % पेक्षा जास्त असेल. ज्यामुळे या परिसरात उष्णतेच्या लाटा पसरतील.
काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीच्या किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किलोमीटर असू शकतो. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हे ही वाचा >> बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आज 18 मे 2025 रोजी ढगाळ वातावरण राहील. पुण्यात कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: दुपारनंतर. सातारा आणि कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात ताशी 50-60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.














