Padma Awards 2024 : महाराष्ट्रातील 12 जणांसह 132 जणांना पद्म, पहा संपूर्ण यादी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

padma awards 2024 maharashtra winners list
padma awards 2024 maharashtra winners list
social share
google news

Padma Awards 2024 Maharashtra : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वैकंय्या नायडू यांच्यासह पाच जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला असून, एकूण १३२ जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील १२ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

ADVERTISEMENT

भारत सरकारच्या वतीने दिले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वर्ष २०२४ साठी पाच जणांना पद्म विभूषण, १७ जणांना पद्म भूषण, तर ११० जणांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. १३२ जणांच्या या यादीत ३० कर्तृत्वान महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना पद्मभूषण, 6 व्यक्तींना पद्मश्री

महाराष्ट्रातील होर्मुसजी कामा (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता), अश्विन मेहता (वैद्यकीय), ज्येष्ठ नेते राम नाईक (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि संगीतकार प्यारेलाल शर्मा (कला) तर कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ नेत्याला भारतरत्न जाहीर!

ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर (सामाजिक), मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे (खेळ), डॉ.मनोहर कृष्णा डोळे (वैद्यकीय), झहीर काझी (साहित्य आणि शिक्षण), डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (वैद्यकीय) आणि कल्पना मोरपारिया (व्यापार) यांना पद्मश्री पुरस्कार झाले आहेत.

पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांची संपूर्ण यादी

padma awards 2024 maharashtra list

ADVERTISEMENT

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले सहा मान्यवर कोण?

बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर यांनी अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.

ADVERTISEMENT

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून, जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.

हेही वाचा >> ‘मी मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केली नाही, फक्त..’, गोविंदगिरी महाराजांचा यू-टर्न

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT