Pankaja Munde : "तुम्ही लोकसभेत काळजी घ्या, पुढे आम्ही घेऊ", पंकजा मुंडेंची साद

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल मोठे विधान केले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंकजा मुंडे यांचं शिरुर येथील कार्यक्रमात विधान

point

लोकसभा निवडणुकीबद्दल काय बोलल्या?

point

पंकजा मुंडेंनी आमदारांना केलं आवाहन

Pankaja Munde Beed Lok Sabha election 2024 : मुंबईपासून दिल्लीपर्यंत लोकसभा जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. पण, काही उमेदवारांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहे. यात बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उतरवणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे बीडमधून ऐनवेळी कोण निवडणुकीच्या रिंगणात असेल, याची उत्सुकताही वाढली आहे. 

ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थानच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला कुणी कुणी मिळून माजी केलं, हे मी सांगूही शकत नाही. अशी माझी परिस्थिती आहे. सुरेश धस, आसबे काका, प्रीतम मुंडे हे तर सत्ताधारी आहेत. त्यामुळे मला काही जाहीरही करता येईना माझी तर पंचाईत झाली आहे. कुणी म्हणत एक कोटी देईन, कुणी म्हणत दोन कोटी देईन, पण माझी तर पंचाईत झाली." 

हे वाचलं का?

आम्हा लोकांचा खारीचा वाटा -पंकजा मुंडे

"महाराजांनी सांगितलं. एवढ्या लोकांचे आभार मानले. ते म्हणाले की, ती टेम्पो बुंदी आहे. त्यामुळे पोटातही कसंतरी व्हायलंय. मी म्हटलं की, सगळे बुंदीची वाट बघताहेत. जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही, पण सगळ्या आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. कारण तुमच्या होण्यामध्ये माजी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे", असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  

"त्यांनी काळजी घ्यावी म्हणायला गेलं तर चार दिवसांत आचारसंहिता लागेल. आता काय काळजी घ्यावी. मग तुम्ही असं करा की काळजी लोकसभेत घ्या. पुढची काळजी आम्ही घेऊ मग. आता लोकसभेची निवडणूक लागलीये. हा निवडणुकीचा मंच नाही, त्यामुळे तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही", असे विधान पंकजा मुंडे यांनी केले. 

ADVERTISEMENT

पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आढावा बैठका

एकीकडे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडेंनी लोकसभा मतदारसंघात आढावा बैठका सुरू केल्या आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना निवडणूक लढायला सांगितले जाऊ शकते, या चर्चेला आढावा बैठकांमुळे बळ मिळू लागले आहे. पण, भाजपकडून उमेदवारी जाहीर होईपर्यंत काहीही सांगता येत नाही. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT