Maratha Morcha: शरद पवार पोहचले जालन्याला, मराठा आंदोलकांना म्हणाले; ‘जे करायचं ते…’

मुंबई तक

Sharad Pawar on maratha morcha : जालन्यातील अंतरावली सराटीमध्ये जात शरद पवार यांनी मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांना जे करायचे आहे ते शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने करु असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

ADVERTISEMENT

Jalna maratha kranti morcha antarwali sarathi sharad pawar visit maratha morcha reservation
Jalna maratha kranti morcha antarwali sarathi sharad pawar visit maratha morcha reservation
social share
google news

Sharad Pawar on maratha morcha : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये चाललेल्या आंदोलनावर केलेला लाठीहल्ला चुकीचा असल्याची टीका शरद पवार (sharad pawar) यांनी केली. महाराष्ट्रातील नेत्यांनी जालना जिल्ह्यातील आंदोलनावर लाठीहल्ला केल्यानंतर कालच शरद पवारांनी मी आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी शरद पवार यांनी जे आंदोलन करायचे ते शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने करूया असं अश्वासन देत त्यांनी मनोज परांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी आंदोलनावर केलेल्या लाठीहल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी दिलेले अश्वासन पूर्ण केलं नाही म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

लाठीहल्ला का केला

शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शांततेने चाललेले असताना आणि चर्चा चालू असतानाच पोलिसांनी का लाठीहल्ला केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा >>Uddhav Thackeray : ‘भाजप म्हणजे भाड्याने जमवलेला पक्ष’,ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

आंदोलनाला गालबोट

मराठा आरक्षणासाठी चाललेले हे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने चालू होते. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलनाला गालबोट लावले. हे आंदोनल लोकशाही मार्गाने चालू असतानाच पोलिसांनी लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार का केला. बंदुकीचे छर्रे का झाडण्यात आले, त्यामुळे अनेक लोकं जखमी झाले असून मीही त्या लोकांची भेट घेतली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp