PUNE: ‘तो’ देवदूतच… कोयत्याचा वार झेलला, तरुणीला जीवदान देणारा लेशपाल जवळगे आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune sadashiv peth youth scythe attack college girl life saved mpsc student leshpal javalge crime news
pune sadashiv peth youth scythe attack college girl life saved mpsc student leshpal javalge crime news
social share
google news

Pune MPSC Student: पुणे: पुण्यातील (Pune) मध्यवर्ती अशा सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) एका 18 वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अगदी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास हा भयंकर प्रकार भररस्त्यात सुरू होता. कॉलेजवयीन तरूणी बोलत नसल्याच्या रागातून तिच्या वर्गातील मुलाने हे भयंकर कृत्य केल्याचं समोर आलं. खरं तर तरुणीचा जीव घ्यायचा याच उद्देशाने तरूणाने तिच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलाने अगदी मोक्याच्या क्षणी धावत जात तरुणीचा जीव वाचवला. (pune sadashiv peth youth scythe attack college girl life saved mpsc student leshpal javalge crime news)

ADVERTISEMENT

तरुणी आपल्याशी बोलत नाही. आपल्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. पण दुसऱ्या तरुणासोबत फिरते याच रागातून आरोपी शंतनू याने तिला रस्त्यात गाठून थेट तिच्यावर आणि तिच्यासोबत असणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला चढवला. खरं तर एक क्षण जरी उशीर झाला असता तर तरुणीचा जीवच गेला असता. पण त्याचवेळी लेशपाल जवळगे नावाच्या एका MPSC च्या विद्यार्थ्याने आरोपी शंतनूचा वार अगदी वरच्या वर झेलला. एवढंच नव्हे तर समयसूचकता दाखवत त्याने कोयता हातातून काढून घेतला. यावेळी आणखी एका मुलाने आरोपी शंतनूला मागून पकडलं. अगदी क्षणार्धात घडलेल्या घटनेमुळे आज एका तरुणीचा जीव वाचला. त्यामुळे लेशपाल आज हा खऱ्या अर्थाने तरुणीसाठी देवदूत ठरला आहे.

लेशपालने कसं वाचवले तरुणीचे प्राण?

या घटनेनंतर लेशपाल याने माध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत नेमकी माहिती दिली.’मी पहिल्यांदा अभ्यासिकेत येत होतो.. आज तसा मला थोडा उशीरच झाला होता. इकडून ती मुलगी धावत येत होती. पहिल्यांदा इथे तिच्यावर वार बसला.. कोयता बघून लोकं सगळे पांगले बाजूला.. ही खूप मोठी सामाजिक विकृती आहे ही. कोणीच पकडायला येत नव्हतं. का तर त्याच्या हातात कोयता होता. मुलगा काय खूप मोठा नव्हता किंवा धाडसी नव्हता. फक्त त्याच्या हातातील हत्यार बघून लोक पांगत होते. बघ्याची भूमिका घेत होते. मुलगी खूप ओरडत-ओरडत पलीकडे आली. मी तिकडे उभा होतो. मी बघितलं मुलगी धावताना… पहिल्यांदा तो मुलगा मला दिसला नाही. मुलगी पुढे गेल्यावर मी पाहिलं तर हा मुलगा कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता.’

हे वाचलं का?

‘मी लगेच बॅग टाकली. तोपर्यंत तो मुलगा कोयता घेऊन तिच्यामागे पळत होता. तोपर्यंत तो तिच्यापर्यंत पोहचला. ती त्या बेकरीच्या इथे खाली बसली स्वत:ला वाचवा म्हणवत. हा कोयत्याने जोरदार तिच्यावर वार करणार होताच. तेवढ्यात मी तिथवर पोहचलोच. त्याचा कोयता वरच्यावर पकडला. नंतर एक मुलगा माझ्या मदतीला पण आला. आम्ही त्याला पकडून पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेलो.’

‘मला खूप लाज वाटली समाजाची.. दर्शना पवारची केस राजगडला झाली आता. आठ दिवस झाले नाहीत त्या घटनेला. तोपर्यंत दुसरी विकृती घडते सदाशिव पेठेत.’ असं म्हणत लेशपालने या घटनेबाबत आणि इतर नागरिकांबाबत संतापही व्यक्त केला.

ADVERTISEMENT

लेशपाल हा तरुण MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक उमदा तरूण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात राहतो आहे. इथेच तो आपल्या परीक्षेची तयारी करत आहे. याशिवाय त्याचा क्रीडा क्षेत्राची आणि विशेषत: कबड्डीची अधिक आवड आहे.

ADVERTISEMENT

रुपाली चाकणकरांकडून लेशपालचं कौतुक

लेशपाल ,आज तुझ्यामुळे एक जीव वाचला ,तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे!!

आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे.ॉ

असं ट्विट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लेशपाल यांचं कौतुक केलं आहे.

तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल आणि हर्षदला जितेंद्र आव्हाडांकडून हजारो रुपयांचं बक्षीस

दरम्यान, स्वत:चा जीव धोक्यात टाकून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 51 हजारांची मदत जाहीर केली आहे.

‘पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल…!!’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

सदाशिव पेठेतील थरार

तरुणीने बोलणं बंद केलं म्हणून मित्राने भर रस्त्यात तिच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना आज पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून तरुणाने हल्ला केल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे.

शंतनू जाधव असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरुन चालले असताना हल्लेखोर तरुणाने त्यांना थांबवले, काही क्षणातच त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. हल्ला झाल्यानंतर तरुणी जीव मुठीत घेऊन धावायला लागली. यावेळी आरोपी शंतनूने तिच्यावर डोक्यावर कोयत्याने वार केला. ज्यानंतर ती जमिनीवर कोसळली. सुरुवातीला तिच्या मदतीला कोणी आलं नाही. मात्र, त्यानंतर रस्तावरील काही नागरिक मुलीच्या दिशेने धावून आले. जखमी अवस्थेत मुलगी धावत असताना लेशपाल जवळगे हा तरुण त्या तरुणीच्या मदतीला आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT