Raksha Bandhan 2026 Date: रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या याचविषयी सविस्तरपणे. याशिवाय राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि चंद्रग्रहणाची वेळही समजून घ्या.
ADVERTISEMENT

Raksha Bandhan: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि स्नेहाचा सण आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधनाची तारीख 27 की 28 ऑगस्ट, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हिंदू पंचांगानुसार, श्रावण शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होईल. तिथीनुसार यंदा रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांग पाहून याच तारखेचे निर्धारण केले आहे.
28 ऑगस्टला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 6 वाजून 23 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 48 मिनिटांपर्यंत आहे. याशिवाय, दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपासून ते 1 वाजून 5 मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्तातही भावाच्या मनगटावर राखी बांधता येईल.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : बेस्ट कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरु, काय आहेत मागण्या?
रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण?
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहणही होणार आहे. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण सकाळी 8 वाजून 4 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतात रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही अडथळा राहणार नाही आणि शुभ मुहूर्तावर राखी बांधता येईल.
